पुणे – तुम्हीही पावसाची आतुरतेने वाट पाहत आहात का? एका बाजूला अंगाची लाहीलाही करणारी उष्णतेची लाट, तर दुसरीकडे हातातोंडाला आलेला घास हिरावून घेणारा अवकाळी पाऊस. राज्यात सध्या हवामानाचा असाच धक्कादायक आणि विचित्र खेळ सुरू आहे. या लहरीपणामुळे सामान्य माणूस उकाड्याने त्रस्त आहे, तर अवकाळीने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे.
अशातच आता सर्वांचे डोळे मान्सूनकडे लागले आहेत. पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी याबाबत ताजी माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही. पण तिथे पावसासाठी आता पोषक वातावरण तयार होऊ लागलं आहे.
Maharashtra Monsoon Update: केरळमध्ये मान्सून अडकला, महाराष्ट्रात पावसाची एन्ट्री कधी?
सध्या अंदमान आणि निकोबार बेटांवर ढग दाटून आले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत केरळमधील मान्सूनचं नेमकं चित्र स्पष्ट होईल, असं सानप यांनी सांगितलं. हवामान खात्याने आधी २६ मे च्या आसपास पावसाची शक्यता वर्तवली होती. पण आता त्यासाठी आणखी किमान दोन दिवस तरी वाट पाहावीच लागणार आहे.
त्यामुळेच, नैऋत्य मोसमी वारे केरळच्या दिशेने कसे सरकतात यावर पुढचं गणित अवलंबून आहे. केरळमध्ये पाऊस कधी आणि कसा सुरू होतो, त्यानंतरच महाराष्ट्रातील पावसाची नेमकी तारीख सांगता येईल. तोपर्यंत राज्यात पावसासाठी ‘वेट अँड वॉच’ शिवाय पर्याय नाही.
मान्सूनची चर्चा सुरू असली तरी राज्याच्या काही भागात उन्हाचा तडाखा आणखी वाढला आहे. अकोला जिल्ह्यात प्रशासनाने २७ आणि २८ मे रोजी तीव्र उष्णतेच्या लाटेचा थेट इशारा दिला आहे. तिथे पारा चाळीशीच्या पार गेलाय. दुपारच्या कडक उन्हात रस्ते ओस पडू लागले आहेत. दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडू नका आणि भरपूर पाणी प्या, असा कडक सल्ला जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
दुसरीकडे, नंदुरबारमध्येही अशीच अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. तिथे तापमान ४० अंशांवर स्थिर असलं, तरी हवेतील आर्द्रता खूप कमी झाली आहे. उष्णतेचा फटका थेट लहान मुलांना बसत असून रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे. खूपच महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडा, अशी ताकीद प्रशासनाने दिली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीत खडाजंगी, पण रात्री उशिरा छगन भुजबळ भाजप नेत्यासोबत काय करत होते?
- राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; राज्यातील १५,६३६ ग्रामपंचायतींमध्ये राजकीय भूकंप होणार?
- मृत्यूच्या दाढेतून ७ जनावरांची सुटका; पैठण पोलिसांच्या धाडसी छाप्याने तस्करांमध्ये खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











