Share

भारतीय संघाच्या यशाचं कारण काय? रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर, म्हणाला…..

रोहित शर्माने मुंबईतील एका कार्यक्रमात भारतीय संघाच्या यशाचे श्रेय खेळाडूंच्या ‘कठोर मेहनतीला’ दिले आहे. तसेच गल्ली क्रिकेटमध्ये काच फुटल्याचा किस्सा सांगत त्याने सर्वांची मने जिंकली.

Published On: 

Rohit Sharma Speech: टीम इंडियाच्या यशाचं कारण काय? रोहितने सांगितलं

भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं गुपित नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडला असेल ना? नुकतंच मुंबईत एका कार्यक्रमात खुद्द ‘हिटमॅन’ रोहित शर्माने (Rohit Sharma) यावर अगदी एका शब्दात उत्तर दिलंय. सोबतच त्याने सांगितलेला गल्ली क्रिकेटचा एक मजेशीर किस्सा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) ‘मुंबई टी-२० लीग’ संदर्भातील एका कार्यक्रमात बोलताना रोहितने जुन्या आठवणींना उजाळा दिला. भारतीय संघ सध्या क्रिकेटच्या मैदानात जो धुमाकूळ घालतोय, त्यामागे फक्त आणि फक्त ‘कठोर मेहनत’ हेच एकमेव कारण असल्याचं त्याने स्पष्ट केलं. तो म्हणाला, “पुरुष असो वा महिला संघ, आमचे खेळाडू जीवतोडून मेहनत घेत आहेत, म्हणूनच आज आपण यशाच्या शिखरावर आहोत.”

Rohit Sharma Speech

यावेळी रोहितने आपला लोकल ट्रेन ते वानखेडे स्टेडियमपर्यंतचा थक्क करणारा प्रवासही उलगडला. तो म्हणाला, “एक काळ असा होता की मी लोकल ट्रेनने राईट साईडची विंडो सीट पकडून वानखेडेवर मॅच बघायला यायचो आणि आज त्याच स्टेडियमवर माझ्या नावाने एक छोटं स्टँड आहे, हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखं आहे.”

पण या कार्यक्रमात खरी रंगत आणली ती रोहितच्या गल्ली क्रिकेटच्या आठवणीने. गल्लीत खेळताना एखाद्या घराची काच फुटली तर काय करायचं? या प्रश्नावर हिटमॅनने दिलेलं उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तो म्हणाला, “कॅप्टनने सांगितलेलं असतं की मॅच जिंकायला काहीही करा. मग अशावेळी जर काच फुटलीच, तर ज्याने फोडली त्याला पैसे मागणं चुकीचं आहे. संपूर्ण टीमने ते पैसे भरले पाहिजेत किंवा ज्याच्या वडिलांकडे जास्त पैसे आहेत त्याने दिले पाहिजेत!”

आयपीएल आणि मुंबई लीगसारख्या स्पर्धांमुळे नव्या खेळाडूंना मोठं व्यासपीठ मिळत असून, याचं सर्व श्रेय एमसीए आणि ग्राऊंड्समनला जातं, असंही रोहितने आवर्जून नमूद केलं. एकंदरीत रोहितच्या या ‘दिलखुलास’ अंदाजाने पुन्हा एकदा मुंबईकरांची मनं जिंकली आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install