🕒 1 min read
Azamgarh | जन्म देणारा बापच जेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी कुटुंबाला उघड्यावर आणतो, तेव्हा मुलालाच बापाच्या विरोधात उभं राहावं लागतं. उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका ५५ वर्षीय व्यक्तीने चक्क सहा वेळा लग्न केलंय. आता तो सातव्या लग्नाच्या तयारीत असताना, त्याच्या अल्पवयीन मुलाने थेट पोलीस स्टेशन गाठून बापाला थांबवण्याची विनवणी केली आहे.
अहरौला पोलीस स्टेशन हद्दीतील अमरजीत मौर्य असं या ५५ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. त्याचा मुलगा शनी मौर्य याने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. शनीची आई अमरजीत यांची तिसरी पत्नी होती.
२०२४ मध्ये अमरजीत यांनी सहावे लग्न केले होते. पण, त्या सहाव्या पत्नीने जमिनीच्या वादातून आणि दागिन्यांच्या मागणीवरून घर सोडले. त्यामुळे अमरजीत आता सातव्यांदा नवरदेव बनण्यासाठी उतावीळ झाले आहेत. यासाठी त्यांनी तब्बल ५० हजार रुपयांचं कर्ज काढलं असून घरातील निम्मी जमीन आधीच गहाण ठेवली आहे.
कुटुंबाची अवस्था अत्यंत बिकट आहे. १२ वीत शिकणाऱ्या शनीला बापाचं कर्ज फेडण्यासाठी मजुरी करावी लागतेय. परीक्षा देण्यासाठी तो नुकताच घरी आला असता, त्याला बापाच्या या नव्या प्रतापाची माहिती मिळाली. सातव्या लग्नासाठी अमरजीत उरलेली जमीनही विकण्याच्या तयारीत आहेत. या प्रकरणी गावचे प्रमुख शत्रुघ्न कनोजिया यांनीही वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर, मुलाकडून तक्रार प्राप्त झाली असून चौकशी सुरू असल्याची माहिती अहरौला पोलीस स्टेशनचे प्रमुख अमित कुमार मिश्रा यांनी दिली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- युद्धाच्या भडक्यात भारताची ताकद जगाला दिसणार! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा दावा, काँग्रेसवर हल्लाबोल
- ‘छावा’ फेम अक्षय खन्नाला मीच ॲक्टिंग शिकवली! प्रसिद्ध अभिनेत्याच्या दाव्याने बॉलिवूडमध्ये उडाली खळबळ
- डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी, इराणचं आज काय होणार? आखाती देशांत मोठी खळबळ













