Share

काव्या मारनने पाकिस्तानी खेळाडूला संघात घेतलं, चाहत्यांचा संताप; आता मोठी कारवाई!

काव्या मारन यांच्या ‘सनरायझर्स लीड्स’ने पाकिस्तानी अबरार अहमदला खरेदी केल्याने संताप. त्यानंतर ‘X’ ने फ्रँचायझीचे अकाऊंट सस्पेंड करत मोठी कारवाई केली आहे.

Published On: 

Kavya Maran Abrar Ahmed Sunrisers Leeds auction controversy

Kavya Maran | क्रिकेटच्या मैदानात कधी कोणता वाद उभा राहील, हे सांगता येत नाही. त्यात भारत-पाकिस्तानचा विषय असेल तर भावना आणखीच तीव्र होतात. आता थेट एका आयपीएल मालकिणीनेच पाकिस्तानी खेळाडूवर कोट्यवधींची बोली लावल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

काव्या मारन यांच्या मालकीच्या ‘सनरायझर्स लीड्स’ या संघाने ‘द हंड्रेड २०२६’ च्या लिलावात पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद याला खरेदी केलं आहे. या निर्णयानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांचा राग अनावर झाला असून सोशल मीडियावर अक्षरशः संतापाची लाट उसळली आहे.आयपीएलशी संबंधित फ्रँचायझी ‘द हंड्रेड’मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना घेणार नाहीत, अशी सुरुवातीला जोरदार चर्चा होती. असं असलं तरी, प्रत्यक्षात मात्र काव्या मारन यांच्या संघाने अबरार अहमदवर चक्क १ लाख ९० हजार पौंड (सुमारे २.३४ कोटी रुपये) खर्च केले आहेत.

Kavya Maran Sunrisers Leeds auction controversy

या निर्णयानंतर भारतीय चाहत्यांनी काव्या मारन आणि त्यांच्या फ्रँचायझीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुसरीकडे, संतापलेल्या चाहत्यांनी थेट काव्या मारन यांच्या ‘सनरायझर्स हैदराबाद’ संघाला आयपीएलमधूनच बाहेर काढण्याची मागणी लावून धरली आहे.

या वाढत्या वादाच्या दरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इलॉन मस्क यांच्या ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने ‘सनरायझर्स लीड्स’चे अधिकृत खाते थेट निलंबित (Suspended) केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या हे अकाऊंट उघडताच केवळ ‘निलंबित’ असा मेसेज दिसत आहे. अद्याप ‘X’ किंवा फ्रँचायझीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळेच या प्रकरणातील गूढ आता आणखी वाढलं आहे.

या लिलावातील घडामोडी पाहता, अबरारसाठी सुरुवातीला ‘ट्रेंट रॉकेट्स’ने १ लाख पौंडची बोली लावली होती. पण अखेर सनरायझर्स लीड्सने मोठी रक्कम मोजून त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं.

या स्पर्धेच्या लिलावात एकूण १३ पाकिस्तानी खेळाडू होते. त्यापैकी फक्त दोनच खेळाडूंना संघ मालकांनी पसंती दाखवली. अबरारव्यतिरिक्त मिस्ट्री स्पिनर उस्मान तारिक याला ‘बर्मिंगहॅम फिनिक्स’ने विकत घेतलं आहे. बर्मिंगहॅम फिनिक्स या फ्रँचायझीचा भारतीय क्रिकेट किंवा कोणत्याही भारतीय मालकांशी कोणताही थेट संबंध नाही. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर कोणतीही टीका झालेली नाही.

पाकिस्तानी गोलंदाज अबरार अहमदच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास, २७ वर्षीय या खेळाडूने पाकिस्तानसाठी ३८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने ५२ बळी टिपले आहेत. आता चर्चा अशी आहे की, चाहत्यांच्या या प्रचंड विरोधानंतर काव्या मारन आणि त्यांची फ्रँचायझी नेमकी काय भूमिका घेणार?

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install