Share

अमिताभ बच्चन संतापले; जया बच्चन यांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर मध्यरात्रीच उडाली खळबळ!

मुंबईतील एका कार्यक्रमात जया बच्चन पापाराझींवर भडकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या रात्रीच्या एका रागीट पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Published On: 

Jaya Bachchan Video: अमिताभ बच्चन यांचा संताप!

बॉलिवूडमध्ये सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने खळबळ उडताना दिसतेय. पण बच्चन कुटुंबाच्या बाबतीत काल रात्री असा काही प्रकार घडलाय, ज्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगलीये. जया बच्चन आणि पापाराझी यांचे खटके उडणे ही काही नवीन गोष्ट नाही. पण काल मुंबईत झालेल्या एका भव्य कार्यक्रमात पुन्हा एकदा तोच ड्रामा पाहायला मिळाला.

या इव्हेंटमध्ये जया बच्चन काही महिलांसोबत निवांत गप्पा मारत उभ्या होत्या. त्याचवेळी पापाराझींचे कॅमेरे त्यांच्याकडे वळले आणि नेहमीप्रमाणे जया बच्चन यांचा पारा पुन्हा चढला. त्यांनी अत्यंत संतापून, “बस आता बस… ठीक आहे आता बस आता,” असं म्हणत पापाराझींना थेट खडेबोल सुनावले. त्यांच्या चेहऱ्यावरील राग त्यावेळी स्पष्ट दिसत होता.

Jaya Bachchan Video

या तणावाच्या वातावरणात तिथे दिग्दर्शक करण जोहर पोहोचला. करण आणि जया बच्चन यांची भेट होत असताना पापाराझींनी लागलीच क्लिक-क्लिक सुरू केलं. जया तिथून निघून गेल्यावर करणने पापाराझींना उद्देशून, “माझ्यामुळे तुम्हाला हा फोटो मिळाला,” अशी मिश्किल टिप्पणी केली. अवघ्या काही तासांतच हा Jaya Bachchan Video सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला.

पण या सगळ्यात खरा ट्विस्ट त्यानंतर आला. हा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच, रात्री उशिरा बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये त्यांनी रागाचे लाल इमोजी शेअर करत थेट ‘आता चूप’ असं म्हटलं आहे.

अमिताभ यांची ही रागीट प्रतिक्रिया नेमकी कोणासाठी आणि कशासाठी होती, याची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र, पत्नी जया यांच्या व्हायरल व्हिडीओवरूनच बिग बी संतापले असावेत आणि त्यांनी ट्रोलर्सला हे उत्तर दिलं असावं, अशा चर्चांना आता उधाण आलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही