सचिनच्या ट्रोलिंगवर अशोक सराफ भडकले; म्हणाले, “तरुणपणीच त्यानं…”, नेटकऱ्यांना दिलं ओपन चॅलेंज!

सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर अशोक सराफांनी मौन सोडलं आहे. नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देत त्यांनी सचिनच्या संघर्षाची आणि अष्टपैलूत्वाची आठवण करून दिली.

Published On: 

Ashok Saraf on Sachin Pilgaonkar: ट्रोलर्सचा घेतला समाचार!

सोशल मीडियावर (Social Media) कोणाला कधी ‘टार्गेट’ केलं जाईल, याचा काहीच नेम नाही. सध्या ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांना त्यांच्या काही वक्तव्यांवरून आणि मुलाखतींमधील किस्स्यांवरून अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. पण आता आपल्या लाडक्या मित्राची अशी खिल्ली उडवताना पाहून ‘अशोक मामा’ म्हणजेच अशोक सराफ (Ashok Saraf) मैदानात उतरले आहेत. त्यांनी ट्रोलर्सची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

एका मुलाखतीत बोलताना अशोक सराफ यांनी या ट्रोलिंगवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “सचिनला ज्या गोष्टींवरून ट्रोल केलं जातं, त्याचं मला प्रचंड वाईट वाटतं. त्याला जे काही यश मिळालंय, ते आयतं किंवा सहजासहजी मिळालेलं नाही. तरुणपणीच त्याने अफाट कष्ट घेतले आहेत.” सचिनच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देताना मामा म्हणाले की, केवळ अभिनयच नाही, तर दिग्दर्शन, गायन, संगीत आणि एडिटिंग (Editing) अशा सर्वच गोष्टींवर त्याची हुकूमत आहे.

Ashok Saraf on Sachin Pilgaonkar

मामांनी नेटकऱ्यांना थेट आव्हानच दिलंय. “त्याच्याकडे असलेल्या ज्ञानावर त्याला ट्रोल करून दाखवा, एकाला तरी जमेल का?” असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला आहे. “मुळात तो नक्की काय करतो आणि काय नाही, हे लोकांना माहीतच नाही. आजकाल कोणालाही ट्रोल करणं आणि काही दिवसांनी विसरून जाणं, हा लोकांचा छंद झालाय,” अशा शब्दांत त्यांनी ट्रोलर्सचे कान टोचले आहेत.

मराठी सिनेसृष्टीत अशोक-सचिन (Ashok-Sachin) ही जोडी म्हणजे एक पर्व आहे. पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री आणि पडद्यामागची ही घट्ट मैत्री आजही अबाधित आहे. दरम्यान, अशोक सराफ यांचा ‘साडे माडे तीन 2’ (Sade Made Teen 2) हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा या दोन दिग्गजांमधलं प्रेम दिसून आलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही