Share

ट्रोलर्समुळे मिळतायत जाहिराती! सचिन पिळगावकर यांचा ट्रोलर्सना जबरदस्त टोला, म्हणाले….

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी सोशल मीडिया ट्रोलिंगवर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली असून, ट्रोलर्समुळे आपल्याला आर्थिक फायदा आणि प्रसिद्धी मिळत असल्याचं म्हटलं आहे.

Published On: 

Sachin Pilgaonkar Interview: ट्रोलर्समुळे मिळतायत जाहिराती!

मनोरंजन विश्वात एखाद्या कलाकाराला डोक्यावर घ्यायचं की थेट ट्रोलिंगच्या दरीत ढकलायचं, हे आजकाल सोशल मीडिया ठरवू लागलाय. पण जेव्हा समोर सचिन पिळगावकर यांच्यासारखा अष्टपैलू आणि अनुभवी कलाकार असतो, तेव्हा ट्रोलिंगचे वारही फुसके ठरतात. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ट्रोल होणाऱ्या सचिन पिळगावकर यांनी आता या सगळ्यावर मौन सोडलं असून, त्यांनी दिलेले उत्तर ऐकून ट्रोलर्सनाही आता विचार करावा लागणार आहे.

“ट्रॉलर्समुळे मला आज नवनवीन जाहिराती मिळत आहेत,” असं धक्कादायक पण सकारात्मक विधान सचिन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केलं आहे. ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या शोच्या निमित्ताने ‘रेडिओ सिटी’ला दिलेल्या मुलाखतीत ते मनमोकळेपणाने बोलले. ट्रोलिंगमुळे त्रास होण्याऐवजी त्याचा आपल्या करिअरला कसा फायदा होतोय, हे सांगताना सचिन पिळगावकर यांनी ट्रोलर्सची चांगलीच फिरकी घेतली.

Sachin Pilgaonkar Interview

सचिन म्हणाले की, करिअरच्या ६५ व्या वर्षी जर मी ट्रोलर्ससाठी इतका महत्त्वाचा वाटत असेल, तर हे माझ्यासाठी मोठं यश आहे. आज सोशल मीडियावर मी इतका चर्चेत आहे की, कंपन्या मला जाहिरातींसाठी विचारत आहेत. याकडे मी एका वेगळ्या नजरेने पाहतोय. “आमच्या कामावर टीका करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, पण वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा अधिकार कोणालाच नाही,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली.

यावेळी त्यांनी शाहरुख खानचा एक किस्सा सांगितला. शाहरुख म्हणाला होता की, जर मला ट्रोल करून कोणाला रात्री शांत झोप लागत असेल, तर मला त्याचा आनंदच आहे. याच विचाराने सचिन पिळगावकर पुढे जाताना दिसतायत. ट्रोलिंग करणाऱ्या मुलांना त्यांनी चक्क आशीर्वाद दिले आहेत. “ही मुलं माझ्या नावाला जितकं महत्त्व देतायत, तितकंच स्वतःच्या नावाला देतील तेव्हा ती नक्कीच मोठी होतील,” असं म्हणत त्यांनी ट्रोलर्सचे कानही टोचले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही