Share

अजितदादांच्या आठवणीत गौतमी पाटील भावूक; दादांच्या ‘त्या’ दोन शब्दांनी जिंकलं होतं मन!

अजित पवारांच्या निधनानंतर गौतमी पाटील गहिवरली. “आम्ही कधीच भेटलो नाही, पण दादांच्या त्या दोन शब्दांनी…” गौतमीने व्यक्त केल्या भावना.

Published On: 

Gautami Patil Reaction: अजितदादांच्या आठवणीत गौतमी भावूक, म्हणाली...

महाराष्ट्राच्या राजकारणातली ही पोकळी कधीच भरून न निघणारी आहे, याचा प्रत्यय सध्या प्रत्येकजण घेतोय. अजितदादांच्या जाण्याने सामान्य कार्यकर्त्यापासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत सगळेच सुन्न झालेत. यातच आता तरुणाईच्या गळ्यातली ताईत असलेल्या गौतमी पाटील (Gautami Patil) हिची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, दादांच्या आठवणीने ती गहिवरून गेली आहे.

दादा आपल्यात नाहीत, यावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नाहीये. गौतमीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. “आईने जेव्हा मला ही बातमी सांगितली, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. दादांच्या बाबतीत असं काही होईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं,” अशा शब्दांत तिने आपला धक्का व्यक्त केला.

Gautami Patil Reaction On Ajit Pawar Death

विशेष म्हणजे, गौतमी दादांना कधीच प्रत्यक्ष भेटली नव्हती. तरीही दादांनी तिच्याबद्दल काढलेले ‘ते’ दोन शब्द तिच्यासाठी लाखमोलाचे ठरले. गौतमी म्हणाली, “आम्ही कधी भेटलो नाही, पण दादा एकदा माझ्याबद्दल दोन शब्द चांगले बोलले होते, तिथेच त्यांनी माझं मन जिंकलं. कलाकारांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहणारा हा नेता होता. कोणाचंही काम अडलं तर दादांकडे गेल्यावर ते १०० टक्के होणारच, हा जो विश्वास होता तो आता कोणाकडे पाहून ठेवायचा?” दादांच्या जाण्याने जे झालंय, ते खूप चुकीचं झालंय, अशी खंतही तिने व्यक्त केली.

काळरात्र ठरलेला २८ जानेवारी २८ जानेवारी २०२६ ची सकाळ महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरली. मुंबईहून बारामतीला सभेसाठी जाताना दादांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. यात अजितदादांसह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेतून महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही