Share

‘लग्नाआधी शारीरिक संबंध…’; दीपिकाच्या ‘त्या’ एका वक्तव्याने बॉलीवूडमध्ये उडाली होती खळबळ!

लग्नाआधी शारीरिक संबंधांबद्दल दीपिका पदुकोणने मांडलं होतं रोखठोक मत; ‘त्या’ एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर झाली होती प्रचंड ट्रोल.

Published On: 

Deepika Padukone: 'लग्नाआधी शारीरिक संबंध...'; दीपिकाच्या वक्तव्याने खळबळ

🕒 1 min read

बॉलीवूडमध्ये ग्लॅमर आहे, तसे वादही आहेत. कधी कोणाचे जुने व्हिडिओ व्हायरल होतील आणि कधी कोणावर ट्रोलिंगची वेळ येईल, हे सांगता येत नाही. सध्या बॉलीवूडची ‘मस्तानी’ म्हणजेच दीपिका पदुकोण (Deepika Padukone) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ती तिच्या एका जुन्या आणि तितक्याच स्फोटक वक्तव्यामुळे.

दीपिका आज रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) सुखी संसार करत आहे. अलीकडेच ती आई झाली आहे. पण तिचं नाव आधी अनेक क्रिकेटर्स आणि अभिनेता रणबीर कपूरसोबत जोडलं गेलं होतं. रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर ती भावनिकदृष्ट्या पूर्णपणे तुटली होती. पण या सगळ्यात, तिचा एक जुना ‘Video’ आणि तिने मांडलेले विचार आजही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात.

Deepika Padukone Statement

रणवीर सिंगला डेट करत असताना दीपिकाने ‘Vogue Magazine’ साठी एक व्हिडिओ शूट केला होता. यात तिने महिला सक्षमीकरणावर (Women Empowerment) भाष्य केलं होतं. पण यात तिने ‘शारीरिक संबंधां’बद्दल (Physical Relationship) जे रोखठोक मत मांडलं, त्यामुळे सोशल मीडियावर नेटकाऱ्यांनी तिला चांगलच धारेवर धरलं होतं.

नेमकं काय म्हणाली होती दीपिका?

या व्हिडिओमध्ये दीपिकाने अतिशय स्पष्ट भूमिका घेतली होती. “मला माझ्या अटींवर आयुष्य जगायचं आहे. स्त्री असो वा पुरुष, कोणावर प्रेम करायचं हा सर्वस्वी माझा निर्णय असेल,” असं ती म्हणाली होती.

पण वादाची खरी ठिणगी पडली ती पुढच्या वाक्याने. दीपिका म्हणाली होती, “लग्नाआधी कोणासोबत शारीरिक संबंध ठेवायचे की नाही, किंवा लग्नानंतरही (Affair) शारीरिक संबंधांबद्दल काय निर्णय घ्यायचा… हे सर्वस्वी माझ्यावर अवलंबून आहे.”

तिच्या या ‘Bold’ विधानाने त्यावेळी चांगलीच खळबळ उडवून दिली होती. दीपिकाचं हे मत जरी ‘My Choice’ आणि वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दल होतं, तरीही भारतीय संस्कृतीचा हवाला देत नेटकाऱ्यांनी तिला जबरदस्त Troll केलं होतं. आजही हा किस्सा बॉलीवूडच्या कॉरिडॉरमध्ये अधूनमधून चर्चिला जातो.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!