🕒 1 min read
क्रिकेटच्या मैदानात रेकॉर्ड तोडणारा ‘किंग’ कोहली (King Kohli) सोशल मीडियाच्या पिचवरून मात्र अचानक ‘हिट विकेट’ झाला की काय? असा प्रश्न सध्या संपूर्ण जगाला पडलाय. गुरुवारी रात्री उशिरा अचानक एक गोष्ट घडली आणि कोट्यवधी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. नेहमी ॲक्टिव्ह असणारा विराट कोहली (Virat Kohli) चक्क इन्स्टाग्रामवरून गायब झाला आहे.
सध्या इन्स्टाग्रामवर (Instagram) विराटचं प्रोफाइल सर्च केल्यावर काहीच हाती लागत नाहीये. पेज रिकामं दिसतंय किंवा ‘User not found’ असा मेसेज येतोय. तब्बल २७४ दशलक्ष (274 Million) फॉलोअर्स असलेल्या जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूचं अकाऊंट असं अचानक नाहीसं होणं ही सामान्य गोष्ट नाही. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, फक्त विराटच नाही तर त्याचा भाऊ विकास कोहली (Vikas Kohli) याचंही अकाऊंट दिसत नाहीये. त्यामुळे हे सामूहिक हॅकिंग (Hacking) आहे, टेक्निकल ग्लिच (Technical Glitch) आहे की विराटने स्वतःहून सोशल मीडियाला रामराम ठोकलाय? यावर तर्क-वितर्कांना उधाण आलंय.
Virat Kohli Instagram Account
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर सध्या चाहत्यांनी स्क्रीनशॉट्सचा पाऊस पाडलाय. काहींच्या मते हा जाहिरातीचा भाग असू शकतो, तर काहींना वाटतंय विराटने ‘सोशल मीडिया डिटॉक्स’ घेतला असावा. मात्र, अद्याप विराट किंवा त्याच्या पीआर टीमकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही.
विराटने नुकतीच कसोटी आणि टी-२० मधून निवृत्ती घेतली असून तो सध्या फक्त एकदिवसीय (ODI) क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे. ८५ आंतरराष्ट्रीय शतकांचा बादशाह असलेल्या विराटने मैदानावर अनेकदा आक्रमक बाणा दाखवलाय, पण सोशल मीडियावरची ही ‘सायलेंट एक्झिट’ चाहत्यांना पचनी पडत नाहीये. आता हे अकाऊंट परत कधी रिकव्हर होणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- सोनं खरेदी करताय? थांबा! 1 तोळ्याचा भाव ऐकून फिरतील डोळे; चांदीनेही रेकॉर्ड मोडला!
- अजितदादांना अनोखी श्रद्धांजली; राष्ट्रवादीची महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांना मोठी विनंती!
- अरिजीतची सिंहची नवी इनिंग? गायकीला रामराम ठोकल्यानंतर आता ‘या’ क्षेत्रात उडवणार खळबळ!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












