दादा गेले, सयाजी शिंदे ढसाढसा रडले; रुग्णालयाबाहेरील ‘ते’ दृश्य पाहून महाराष्ट्र हेलावला!

अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत शोकाकुल वातावरण; रुग्णालयाबाहेर अभिनेते सयाजी शिंदे यांना अश्रू अनावर, सावरण्यासाठी पोलिसांची मदत.

Published On: 

Ajit Pawar Death: सयाजी शिंदे ढसाढसा रडले; रुग्णालयाबाहेरचा व्हिडिओ व्हायरल!

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘पहाडी आवाज’ आज कायमचा शांत झाला आहे. बारामतीत घडलेल्या त्या एका घटनेने केवळ राजकीय क्षेत्रच नव्हे, तर सर्वसामान्यांचे काळीजही पिळवटून टाकले आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाच्या बातमीने राज्यावर शोककळा पसरली असतानाच, बारामतीतील रुग्णालयाबाहेरचे दृश्य उपस्थितांना रडवून गेले.

रुग्णालयाबाहेर चाहत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा जनसागर लोटला आहे. याच गर्दीत अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांची अवस्था पाहून अनेकांना हुंदका आवरता आला नाही. नेहमी आपल्या खंबीर आवाजासाठी ओळखले जाणारे सयाजी शिंदे आज लहान मुलासारखे ढसाढसा रडताना दिसले. त्यांना बोलताही येत नव्हते, शब्द फुटत नव्हते. डोळ्यांतून फक्त अश्रूंच्या धारा वाहत होत्या.

Ajit Pawar Death

सयाजी शिंदे यांची अवस्था इतकी बिकट झाली होती की, त्यांना चालणंही कठीण झालं होतं. अखेर पोलिसांनी त्यांना गर्दीतून सावरत आणि आधार देत बाजूला नेले. विशेष म्हणजे, 11 ऑक्टोबर 2024 रोजी सयाजी शिंदे यांनी अजितदादांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आपल्या नेत्याचं असं अचानक जाणं त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबईहून बारामतीला आलेल्या अजित पवारांच्या विमानाला लँडिंगच्या वेळी धावपट्टीच्या बाजूला भीषण अपघात झाला. या दुर्देवी घटनेत अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच बारामतीकरांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. सध्या पोलीस प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, पण कार्यकर्त्यांचा आक्रोश थांबता थांबत नाहीये.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही