बांगलादेश बाहेर होताच शाहिद आफ्रिदी थयथयाट; भारताचं नाव घेत ICC ला सुनावले खडे बोल!

बांगलादेशला टी-20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळताच शाहिद आफ्रिदीने भारताचं नाव घेत ICC वर दुजाभावाचा आरोप केला आहे. वाचा नेमकं प्रकरण काय आहे.

Published On: 

Shahid Afridi on ICC: भारताचं नाव घेत आफ्रिदी भडकला!

पाकिस्तानचे माजी खेळाडू भारतावर टीका करण्याची किंवा वादात ओढण्याची एकही संधी सोडत नाहीत, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. यावेळी निमित्त ठरलाय तो आगामी टी-20 वर्ल्ड कप आणि बांगलादेशचा संघ. बांगलादेशला वर्ल्ड कपमधून वगळताच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) चांगलाच भडकला आहे. विशेष म्हणजे, आपली नाराजी व्यक्त करताना त्याने पुन्हा एकदा भारताकडे बोट दाखवत ICC च्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात टी-20 वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिला होता. यानंतर ICC ने कडक पाऊल उचलत बांगलादेशला स्पर्धेतून वगळले आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडला संधी दिली. नेमकी हीच गोष्ट आफ्रिदीला खटकली आहे. सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करताना आफ्रिदीने थेट 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीची आठवण करून दिली.

Shahid Afridi on ICC

आफ्रिदी म्हणाला, “जेव्हा भारताने सुरक्षेचे कारण देत पाकिस्तानात येण्यास नकार दिला होता, तेव्हा ICC ने त्यांची बाजू ऐकून घेत सामने दुबईत हलवले. मग आता बांगलादेशच्या वेळी हा न्याय कुठे गेला?” भारतासाठी एक नियम आणि बांगलादेशसाठी दुसरा, असा दुजाभाव का? असा सवाल त्याने उपस्थित केला आहे.

“ICC ने क्रिकेट जगतात पूल बांधायला हवेत, भिंती जाळायला नव्हेत,” अशा कडक शब्दांत आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सुनावले आहे. बांगलादेशच्या खेळाडूंना आणि चाहत्यांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी, असंही तो म्हणाला. दरम्यान, ICC ने मात्र बांगलादेशचा सुरक्षेचा दावा फेटाळून लावला असून, भारतात खेळाडूंना कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता T20 World Cup 2026 मध्ये स्कॉटलंडचा संघ नशीब आजमावताना दिसणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही