Share

हार्दिकचा पारा चढला! भर मैदानात मुरली कार्तिकसोबत कडाक्याचं भांडण? प्रेक्षक पाहतच राहिले

रायपूरमध्ये सामन्याआधी हार्दिक पांड्या आणि मुरली कार्तिक यांच्यात खडाजंगी? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण.

Published On: 

Hardik Pandya and Murali Kartik Fight Video : रायपूरमध्ये काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट हे ‘जंटलमॅन’ लोकांचं खेळ मानलं जातं, पण कधी कधी मैदानावरील उष्णता डोक्यात जाते आणि मग जे घडतं ते कॅमेऱ्यात कैद होतंच. सध्या टीम इंडिया न्यूझीलंडला लोळवून विजयाचा जल्लोष करत असली, तरी सोशल मीडियावर मात्र एका वेगळ्याच व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. रायपूरच्या मैदानात सामना सुरू होण्याआधीच एक ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा पाहायला मिळाला. हा ड्रामा होता भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि समालोचक मुरली कार्तिक यांच्यात.

Hardik Pandya and Murali Kartik Fight Video

रायपूरमध्ये दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी सरावासाठी हार्दिक मैदानात आला. तिथे त्याची गाठ माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर मुरली कार्तिकशी पडली. सुरुवातीला सर्वकाही सामान्य वाटत होतं, पण अचानक हार्दिकच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. व्हायरल व्हिडिओमध्ये हार्दिक काहीतरी तावातावाने बोलताना दिसतोय. तो इतका संतापलेला दिसला की, आजूबाजूचे प्रेक्षकही पाहतच राहिले. Hardik Pandya and Murali Kartik Fight या नावाने सध्या हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आहे.

हार्दिक रागाच्या भरात बोलत बोलत थोडा दूर जातो, पण पुन्हा माघारी फिरतो आणि कार्तिकशी चर्चा करतो. “त्यामुळेच”, हे नेमकं भांडण होतं की गंभीर विषयावरची चर्चा, याबाबत अजूनही संभ्रम आहे. या वादाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही, पण नेटकऱ्यांनी मात्र यावर तर्कवितर्क लढवायला सुरुवात केली आहे. कोणी म्हणतंय की जुन्या कोणत्यातरी वक्तव्याचा राग हार्दिकने काढला, तर काहींच्या मते हा फक्त ‘कॅज्युअल’ संवाद होता.

या वादाचा परिणाम हार्दिकच्या खेळावर मात्र झाला नाही. पहिल्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्याने एक विकेट काढली. रायपूरमध्ये भारताची अवस्था 6 धावांवर 2 विकेट्स अशी बिकट झाली होती, पण ईशान किशन (76) आणि सूर्यकुमार यादव (82*) यांनी वादळी खेळी करत भारताला 7 विकेट्सने विजय मिळवून दिला. भारताने आता मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली असली, तरी चर्चा मात्र हार्दिक आणि कार्तिकच्या त्या व्हिडिओचीच जास्त आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install