Share

‘सागर भाऊ, मळ तू डबल..’, डीपी दादाने शेअर केला बिग बॉसच्या घरातील व्हिडिओ, म्हणाला…..

बिग बॉसच्या घरात सागर कारंडे तंबाखू मळताना दिसला? धनंजय पोवारने व्हिडिओ शेअर करत संशय व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

Published On: 

Bigg Boss Marathi 6 : सागर कारंडे घरात तंबाखू खातो? धनंजय पोवारचा व्हिडिओ व्हायरल

बिग बॉसचं घर म्हणजे नुसते राडे, भांडणं आणि आरडाओरडा, असंच तुम्हाला वाटतं का? पण थांबा, यावेळी विषय काहीतरी वेगळाच आणि तितकाच धक्कादायक आहे. कॅमेऱ्याच्या नजरेतून काहीही सुटत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. ‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि तो पाहून प्रेक्षकांना प्रश्न पडलाय… सागर भाऊ, हे नक्की काय चाललंय? बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा गाजलेला स्पर्धक धनंजय पोवार म्हणजेच आपल्या डीपी दादाने (Dhananjay Powar) हा व्हिडिओ शेअर करत एक खळबळजनक दावा केला आहे.

Bigg Boss Marathi 6

डीपी दादाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सागर कारंडेच्या हालचाली बघून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा व्हिडिओ 11 व्या एपिसोडमधील असल्याचं बोललं जातंय. व्हिडिओमध्ये सागर राधासोबत निळू फुलेंच्या आवाजात मस्करी करताना दिसतोय. पण राधा तिथे येताच सागरने लगबगीने आपले हात मागे घेतले. डीपी दादाने यावर आपल्या अस्सल कोल्हापुरी शैलीत भाष्य केलंय. तो म्हणतो, “सागर भाऊ, मळ तू डबल…”

डीपी दादाच्या म्हणण्यानुसार, सागरच्या हातांच्या हालचाली संशयास्पद आहेत. एखादा तंबाखू खाणारा माणूस ज्याप्रमाणे हातावर तंबाखू मळतो, त्यातला कचरा खाली टाकतो आणि हात झटकतो, अगदी तसंच काहीतरी सागर करताना दिसतोय. डीपी दादा म्हणतो, “त्याच्या पाठीमागे जे दिसतंय ती कदाचित तंबाखूची पुडी आहे. मला डाऊट आहे. खरं खोटं तुम्ही बघा, पण मला हे जाणवलं.”

एकीकडे रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर सागरच्या खेळाचं कौतुक केलं होतं. पण आता Bigg Boss Marathi 6 च्या घरात सागर खरंच तंबाखू मळत होता की ती फक्त हातांची सवय होती? यावर आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. डीपी दादाच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. बिग बॉसच्या घरात अशा गोष्टींना सक्त मनाई असते, त्यामुळे हा व्हिडिओ आता वादाचा विषय ठरू शकतो.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install