Share

भाषण संपलं, फडणवीसांनी माईक खाली केला; पण आशिष शेलारांनी थांबवलं अन्…; व्हिडीओत दिसला ‘तो’ क्षण!

भाषण संपवून देवेंद्र फडणवीस माईक खाली ठेवत होते, तितक्यात आशिष शेलारांनी त्यांना एक विनंती केली. त्यानंतर जे घडलं तो व्हिडीओ आता व्हायरल होतोय.

Published On: 

 Devendra Fadnavis BJP Victory Celebration Viral Video

मुंबई – राज्यात महायुतीच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच, एका व्हायरल व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. निमित्त ठरलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं भाषण आणि भाजप नेते आशिष शेलार यांची ‘ती’ खास विनंती! भरसभेत भाषण संपवून फडणवीस माईक बाजूला ठेवत होते, इतक्यात असं काही घडलं की उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

झालं असं की, २९ पैकी २५ महानगरपालिकांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी उभे राहिले. त्यांनी अस्खलित मराठीत कार्यकर्त्यांचे आभार मानले. “हा विजय माझा नाही, तर तिकीट न मिळताही २४ तास राबणाऱ्या कार्यकर्त्याचा आहे,” असं सांगत त्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’चा नारा दिला. भाषण संपलं असं वाटून फडणवीसांनी माईक तोंडावरून बाजूला केला.

नेमका हाच क्षण कॅमेऱ्यात कैद झाला!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माईक खाली करत असतानाच, बाजूला उभ्या असलेल्या आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी त्यांना अडवलं. शेलार काहीतरी पुटपुटले आणि त्यांनी हाताने इशारा केला. व्हिडीओ बारकाईने पाहिला असता, शेलार त्यांना “हिंदीमध्ये बोला” अशी विनंती करत असल्याचे स्पष्ट जाणवते. शेलारांचा तो इशारा मिळताच फडणवीसांनी पुन्हा माईक हातात घेतला आणि थेट हिंदीतून फटकेबाजी सुरू केली.

आशिष शेलारांचा तो आग्रह फडणवीसांनी एका सेकंदात झेलला. त्यांनी पुन्हा माईक सावरला आणि “आज हम तुम्हारे साथ है…” म्हणत हिंदीत भाषणाला सुरुवात केली. शेलारांनी मुंबई आणि अमराठी मतदारांसाठी हा आग्रह धरला असावा, आणि फडणवीसांनीही (Devendra Fadnavis) तो मानत थेट पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर आणि मुंबईच्या विजयावर हिंदीतून भाष्य केलं. सध्या सोशल मीडियावर फडणवीसांच्या भाषणापेक्षा, शेलारांच्या त्या ‘टायमिंग’ची आणि दोघांमधल्या केमिस्ट्रीचीच जास्त चर्चा रंगली आहे.

 Devendra Fadnavis BJP Victory Celebration Viral Video

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही