Share

सलमान खानच्या घरी भाजप नेत्याची एन्ट्री; सलीम खान यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ!

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आशिष शेलारांनी थेट सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट गाठत वडील सलीम खान यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय समीकरणं बदलणार का? चर्चांना उधाण!

Published On: 

Ashish Shelar Meets Salim Khan

मुंबई – मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी काय वाट्टेल ते करायची तयारी नेत्यांनी दाखवली आहे, पण आता समोर आलेला फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकांच्या रणधुमाळीत बॉलीवूड आणि राजकारण यांचं नातं जुनं असलं तरी, आज वांद्रे बँडस्टँडवर जे घडलं, त्याने राजकीय निरीक्षकांनाही विचार करायला भाग पाडलंय. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी थेट बॉलीवूडचा ‘दबंग’ सलमान खानचे वडील आणि दिग्गज लेखक सलीम खान (Salim Khan) यांची भेट घेतली आहे!

सध्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असून सर्वांची नजर श्रीमंत मुंबई महापालिकेवर आहे. वांद्रे हा तसाही सेलिब्रिटींचा गड. याच भागात प्रचारासाठी फिरत असताना आशिष शेलार थेट सलीम खान यांच्या भेटीला पोहोचले. केवळ सदिच्छा भेट नव्हे, तर यावेळी शेलार यांनी सलीम खान यांना महायुतीच्या उमेदवाराला मत देण्याचं आवाहन केलं.

Ashish shelar meets salim khan

आशिष शेलार यांनी स्वतः या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात ते सलीम खान यांच्याशी हसून संवाद साधताना दिसत आहेत. कॅप्शनमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलंय, “प्रचारादरम्यान प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांची भेट झाली आणि महायुतीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं.”

खान कुटुंब आणि महायुतीचे नेते यांच्यातील जवळीक नवी नाही. याआधी एकनाथ शिंदेंनी गोळीबार प्रकरणानंतर सलमानची भेट घेतली होती, तर सलमाननेही गणपती बाप्पाच्या दर्शनाला शिंदेंच्या घरी हजेरी लावली होती. आता थेट वडिलांशीच भाजप नेत्याचा संवाद झाल्याने, खान परिवार उघडपणे महायुतीचा प्रचार करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जरी खान कुटुंबाकडून अजून अधिकृत पाठिंबा जाहीर झाला नसला, तरी या ‘एका भेटीने’ वांद्र्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे, हे मात्र नक्की!

दुसरीकडे, सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ (Battle of Galwan) या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे, जो १७ एप्रिल २०२६ ला प्रदर्शित होत आहे. पण सध्या तरी चर्चा आहे ती त्याच्या वडिलांच्या आणि आशिष शेलारांच्या ‘पॉलिटिकल मीटिंग’ची!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही