Share

‘पुष्पा’चा आवाज बिग बॉसच्या घरात घुमणार? मराठी इंडस्ट्रीतला ‘हा’ सुपरस्टार स्पर्धक म्हणून एन्ट्री घेणार?

Rumors suggest Bollywood and Marathi actor Shreyas Talpade might join Bigg Boss Marathi 6 as a contestant.

Published On: 

Rumors suggest Bollywood and Marathi actor Shreyas Talpade might join Bigg Boss Marathi 6 as a contestant.

बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 6) घरात नेमकं कोण जाणार? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी प्रेक्षक सीआयडीच्या प्रद्युम्नसारखे कामाला लागले आहेत. त्यातच रितेश भाऊ होस्ट असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मागच्या पर्वात रील स्टार सूरज चव्हाणने बाजी मारली होती, पण आता समोर आलेल्या एका नावाने सर्वांचे डोळे विस्फारले आहेत. ज्याने साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला आपला आवाज दिला, तो मराठमोळा सुपरस्टार आता बिग बॉसच्या घरात डाव मांडणार का?

सोशल मीडियावर आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये सध्या ज्या नावाचा डंका वाजतोय, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आहे. श्रेयस तळपदे ‘बिग बॉस मराठी ६’ मध्ये स्पर्धक म्हणून एन्ट्री घेण्याची दाट शक्यता आहे. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा हा ‘इकबाल’ जर घरात आला, तर टीआरपीचे सगळे रेकॉर्ड तुटणार यात शंका नाही.

Will the voice of ‘Pushpa’ resonate in the Bigg Boss house?

श्रेयसच्या टीमकडून किंवा कलर्स मराठी वाहिनीकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. सोशल मीडियावर मात्र या बातमीने धुमाकूळ घातलाय. काहींना वाटतंय की श्रेयससारखा मोठा स्टार स्पर्धक म्हणून येणार नाही, तर काहींना वाटतंय की रितेश देशमुखसोबतच्या मैत्रीखातर तो येऊ शकतो. चाहत्यांमध्ये आतापासूनच “श्रेयस आला तर जिंकणारच!” अशा कमेंट्सचा पाऊस पडतोय.

२०२६ हे वर्ष श्रेयससाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याचे ‘आझाद भारत’, ‘द गेम ऑफ गिरगिट’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ हे बिग बजेट सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. इतकं बिझी शेड्युल असताना तो १०० दिवस घरात कसा राहणार? हे कोडं ११ जानेवारीलाच सुटेल. तोपर्यंत ही फक्त एक जोरदार चर्चा आहे, असं समजायला हरकत नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही