🕒 1 min read
मुंबई – वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या टीम इंडियाला नजर लागली की काय? सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक भारताच्या ‘मिडल ऑर्डर’चा कणाच मोडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. T20 वर्ल्डकप 2026 अवघ्या काही दिवसांवर आला असताना, संघातील एका हुकमी एक्क्याला गंभीर दुखापत झाल्याने टीम इंडियाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
भारतीय संघाचा युवा स्टार टिळक वर्मा (Tilak Varma) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये होता. विजय हजारे ट्रॉफीसाठी राजकोटमध्ये असताना बुधवारी सकाळी नाश्ता केल्यानंतर अचानक त्याच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या. वेदना इतक्या तीव्र होत्या की त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर त्याला पोटाची शस्त्रक्रिया (Surgery) करण्याचा सल्ला दिला आहे.
Tilak Varma Injury Update | T20 World Cup 2026
बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळक वर्माला सावरण्यासाठी किमान 3 ते 4 आठवडे लागणार आहेत. याचा अर्थ तो 21 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून (IND vs NZ) बाहेर पडला आहेच, पण आगामी T20 वर्ल्डकपमध्ये खेळण्यावरही आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
आता ‘त्या’ जागेवर कुणाला संधी? टिळक वर्मा बाहेर गेल्यास त्याची जागा कोण घेणार?
वर्ल्डकपसाठी अनेकजण शुभमन गिलचं (Shubman Gill) नाव घेत असले तरी, त्याला संधी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. टिळकच्या जागी राजस्थान रॉयल्सचा स्टार रियान पराग (Riyan Parag) हे नाव सध्या आघाडीवर आहे.
शर्यतीत अजून एक वाघ आहे…
दुसरीकडे, दुखापतीतून सावरलेला श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पुन्हा एकदा मैदानात परतला आहे. विजय हजारे ट्रॉफीत मुंबईकडून खेळताना त्याने नुकतंच 53 चेंडूत 82 धावा कुटून आपली फिटनेस सिद्ध केली आहे. बंगळुरूच्या एनसीएने (NCA/COE) त्याला ‘मॅच फिट’ घोषित केल्याने आता टिळकच्या जागी रियान पराग विरुद्ध श्रेयस अय्यर असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, यशस्वी जैस्वाल आणि हार्दिक पांड्या देखील आपापले सामने आटोपून लवकरच भारतीय संघात सामील होत आहेत. पण टिळक वर्माची ही दुखापत भारतासाठी डोकेदुखी ठरणार, हे मात्र नक्की!
📌 महत्वाच्या बातम्या
- “वाटलं किशमिश येईल, पण…” मुलगी न झाल्याचं दु:ख? भारतीने भर सेटवर पती हर्षची ‘पोलखोल’ केली!
- शाहीन आफ्रिदीची मोठी वल्गना; भारताला दिला थेट इशारा, म्हणाला – “आम्ही मैदानातच बघून घेऊ!”
- ॲशेस गाजवल्यावर मिशेल स्टार्क घेणार निवृत्ती? ‘त्या’ एका निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ; म्हणाला, “अजून तर…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












