Share

विलासरावांच्या ‘तिन्ही छाव्यांनी’ घेरलं; भाजप प्रदेशाध्यक्षांनी अखेर नमतं घेतलं! माफी मागत म्हणाले, “रितेश माझा…”

BJP leader Ravindra Chavan apologizes after facing severe backlash from Amit, Riteish, and Dheeraj Deshmukh over his remarks on Vilasrao Deshmukh.

Published On: 

Ravindra Chavan, Amit, Riteish Deshmukh, Dhiraj Deshmukh

लातूर– राजकारणात ‘विलासराव’ (Vilasrao Deshmukh) हे नाव फक्त नाव नाही, तर एक इमोशन आहे, हे भाजप नेत्याला चांगलंच महागात पडलंय. दिवंगत नेत्याची आठवण पुसण्याची भाषा करणाऱ्या रवींद्र चव्हाणांना आता चक्क माफी मागावी लागली आहे. विलासराव देशमुखांच्या तिन्ही मुलांनी अमित, रितेश (Riteish Deshmukh) आणि धीरज यांनी एकाच वेळी चौफेर हल्ला चढवल्याने भाजपला लातूरमध्ये ‘बॅकफूट’वर यावं लागलं आहे.

रितेशचा ‘तो’ व्हिडिओ आणि अमित देशमुखांचा संताप भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी “विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील” असं वक्तव्य करताच अभिनेता रितेश देशमुखने अत्यंत संयमी पण तितक्याच धारदार शब्दांत सुनावले. “लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही,” या रितेशच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर भाजपला आरसा दाखवला.

आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी तर भाजपच्या राजकारणाचे वाभाडेच काढले. “ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सध्या राज्यात धमकावणे, उमेदवार पळवणे आणि हिंसाचार सुरू आहे,” असा घणाघात अमित यांनी केला. तर धाकटे बंधू धीरज देशमुख यांनी “साहेब, तुम्ही आहात… आमच्यातच आहात,” असं ट्विट करत वडिलांच्या आठवणी जागवल्या. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी तर हे “सत्तेचा माज” असल्याचं म्हणत भाजपला कडक इशारा दिला.

Ravindra Chavan apologizes to Riteish Deshmukh

अखेर रवींद्र चव्हाणांची माघार

देशमुखांच्या तिन्ही लेकांनी आणि लातूरकरांनी घेरताच रवींद्र चव्हाणांचे (Ravindra Chavan) सूर पूर्णपणे बदलले. वादावर पडदा टाकण्यासाठी त्यांनी थेट माफीच मागितली. “रितेश माझा अत्यंत चांगला मित्र आहे, त्याच्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो. याकडे राजकीय दृष्टीने पाहू नका,” असं म्हणत चव्हाणांनी सारवासारव केली. थोडक्यात काय, तर लातूरच्या ‘गढी’ला धक्का लावणे भाजपला चांगलेच भोवल्याचे दिसत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install