🕒 1 min read
राजकारणात टीका-टिप्पणी चालते, आरोप-प्रत्यारोपही होतात, पण भर सभेत थेट ‘रस्त्यावर ठोकून काढण्याची’ भाषा वापरली तर? ठाण्यात सध्या नेमकं हेच घडलंय. ठाकरे आणि मनसे युतीचा वचननामा प्रकाशित करण्यासाठी जमलेल्या नेत्यांच्या गर्दीत संजय राऊतांचा (Sanjay Raut) पारा चांगलाच चढलेला दिसला. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत अत्यंत आक्रमक शब्दांत आव्हान दिलं आहे.
Sanjay Raut challenging Eknath Shinde
संजय राऊत, राजन विचारे आणि अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत ठाण्याचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, “तुमच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर १५ मिनिटं पोलीस बाजूला करा, ठाण्यातल्या रस्त्यावर तुम्हाला ठोकून काढू.” राऊतांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस संरक्षणाचा आधार घेऊन राजकारण करणाऱ्यांना हे उघड आव्हान असल्याचं बोललं जात आहे.
राऊत इथेच थांबले नाहीत. त्यांनी ठाण्याला चक्क ‘ड्रग्जचा अड्डा’ आणि ‘गद्दारांचे शहर’ म्हटले आहे. एकेकाळी तलावांचे आणि संस्कृतीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्याची ओळख आता ‘लयारी’ (गँगवारसाठी कुप्रसिद्ध) सारखी झाली आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. इतकेच नाही तर, “इथल्या ड्रग्जचे कनेक्शन साताऱ्यात पोहोचले आहे आणि एका बड्या नेत्याच्या नातेवाईकाच्या दारातच कारखाना सापडला,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला. ठाण्यात सध्या पानटपरीवरही ड्रग्ज मिळत असल्याचा दावा करत त्यांनी (Sanjay Raut) प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘शिंदे म्हणजे ठाणे नव्हे…’
ठाणे हे एकनाथ शिंदेंचं नसून आजही आनंद दिघेंचं आहे, हे सांगायलाही राऊत विसरले नाहीत. “एका माणसामुळे ठाण्याला गद्दारांचं शहर म्हटलं जातंय, हा डाग आम्हाला पुसायचा आहे,” असा घणाघात त्यांनी केला. आता राऊतांच्या या ‘ठोकून काढण्या’च्या भाषेवर शिंदे गट काय प्रत्युत्तर देणार, आणि पोलीस या वक्तव्याची दखल घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुंबईकरांनो, आज-उद्या हाल होणार! पश्चिम रेल्वेच्या 215 लोकल फेऱ्या रद्द; नेमकं कारण काय?
- “मोदींनी कैलास बांधला अन् शिंदेंनी समुद्र…”, “डोममध्ये जमले होते ‘डोमकावळे’…”; उद्धव ठाकरेंची तुफान फटकेबाजी
- तुम्ही काय ‘नायक’ मधले अनिल कपूर आहात का?”; उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना धुतलं, थेट निलंबनाची मागणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












