Share

तुम्ही काय ‘नायक’ मधले अनिल कपूर आहात का?”; उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना धुतलं, थेट निलंबनाची मागणी!

Uddhav Thackeray demands the suspension of Speaker Rahul Narwekar

Published On: 

Uddhav Thackeray

मुंबई – विधानसभा अध्यक्षांचे पद हे न्यायदेवतेसारखे असते, तिथे बसलेली व्यक्ती निःपक्ष असावी लागते. पण महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी या पदाची गरिमा घालवून राज्याचे ‘यूपी-बिहार’ करण्याचा घाट घातला आहे का? असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यावर सडकून टीका करताना ठाकरेंनी थेट त्यांच्या निलंबनाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

“स्वतःला सिनेमातला हिरो समजता?”

राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवताना उद्धव ठाकरे म्हणाले, “नार्वेकर स्वतःला ‘नायक’ चित्रपटातील अनिल कपूर समजतात का? त्यांना वाटतं ते काहीही करू शकतात.” अध्यक्षांना कोणाची सुरक्षा काढण्याचा किंवा देण्याचा अधिकार फक्त सभागृहापुरता मर्यादित असतो. मात्र, नार्वेकर बाहेरही दादागिरी करत असल्याचा आणि पदाचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप ठाकरेंनी केला. निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन नार्वेकरांना तात्काळ निलंबित करावे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणीही त्यांनी केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install