🕒 1 min read
मीरा-भाईंदर- राज्यात महायुतीचे सरकार असले तरी मीरा-भाईंदरमध्ये मात्र ‘युती’च्या नावाखाली ‘कुस्ती’ सुरू असल्याचं चित्र आहे. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. “तुम्ही एमआयएमसोबत युती करता, म्हणून आता लोक तुम्हाला ‘नरेंद्र मियाँ’ म्हणायला लागले आहेत,” असा खळबळजनक टोला सरनाईकांनी लगावला आहे.
Pratap Sarnaik attacks BJP leader, calling him “Narendra Miya”
नेमकं प्रकरण काय?
प्रभाग क्रमांक ९ आणि २२ मध्ये भाजप नेत्याने चक्क एमआयएम (MIM) च्या उमेदवारासोबत युती केल्याचा गंभीर आरोप सरनाईकांनी केला. ते म्हणाले, “शिवसेना-भाजपची पवित्र युती तुम्ही नाकारता आणि पहिल्यांदाच एमआयएमसोबत जाता? हे मीरा-भाईंदरच्या जनतेला मान्य नाही.”.
“मीरा-भाईंदरचा ‘बजरंगी भाईजान’ आलाय…”
सरनाईक यांनी विरोधकांना कडक इशारा दिला आहे. “मीरा-भाईंदरचा हा ‘बजरंगी भाईजान’ निस्सीम हनुमान भक्त आहे. ज्याप्रमाणे हनुमानाने शेपटीने लंका जाळली, तशीच मीरा-भाईंदरमधील भ्रष्टाचाराची लंका मी दहन करणार आहे,” असे खुले आव्हानच त्यांनी दिले.
राज्यात शिंदे-फडणवीस-पवार एकत्र असताना स्थानिक पातळीवर मात्र नेत्यांचे एकमेकांवर असे वैयक्तिक वार सुरू आहेत. भाजप नेते नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यातील हा वाद आता विकोपाला गेला असून, ‘नरेंद्र मियाँ’ या उल्लेखामुळे वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. या ‘लंका दहना’च्या वक्तव्यावर भाजप काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ६,६,६,६,६,६…; चौकारांशी ‘ब्रेकअप’, फक्त षटकारांशी व्यवहार! वैभव सूर्यवंशीच्या वादळाने चेंडूच हरवला
- “हॅलो आका, व्यवस्था करा…”; पुण्यातल्या ‘त्या’ गुंडावरून काँग्रेसचे ‘मीम वॉर’! भाजपच्या बड्या नेत्याला केले टार्गेट
- “लाडकी बहीण योजना बंद पडणार?”; CM देवेंद्र फडणवीसांनी जालन्यातून दिली ‘ही’ मोठी बातमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












