Share

अजितदादा अन् साहेब पुन्हा एकत्र येणार? निलेश लंकेंनी फोडला बॉम्ब; म्हणाले, “दोघांनाही आनंदच होईल!”

MP Nilesh Lanke hints at a possible reunion of NCP factions, stating both Sharad Pawar and Ajit Pawar would be happy if they came together.

Published On: 

"अजित पवार गटाकडून पक्षात येण्याची ऑफर आहे का?"; Nilesh Lanke म्हणाले...

पुणे – राजकारणात कधी काय होईल, हे ब्रह्मदेवाला सुद्धा सांगता येत नाही, असं म्हणतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निमित्त ठरलंय ते राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांचं एक खळबळजनक विधान! पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीत बोलताना लंके यांनी चक्क दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधानच वाटेल,” असं म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात नवं वादळ निर्माण केलंय.

सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना लंके मनमोकळेपणाने व्यक्त झाले. “राष्ट्रवादी हा पक्ष नसून पवार साहेबांचा परिवार आहे. हा परिवार सुखात आणि दुःखात एकत्र राहिला आहे. राजकारण हे क्षणाला बदलत असतं, त्याचं भाकित कोणी करू शकत नाही. त्यामुळे भविष्यात काय होईल, हे सांगता येत नाही,” असे सूचक संकेत त्यांनी (Nilesh Lanke) दिले.

“पुण्याचा आणि पिंपरी-चिंचवडचा पाया शरद पवारांनी रचला, आयटी पार्क आणलं. पण अजितदादांनी या शहरांना वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलं,” अशी दिलखुलास कबुली लंकेंनी (Nilesh Lanke) दिली.

एकीकडे दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर आगपाखड करत असताना, लंके यांनी मात्र “सगळे एकत्र आल्यावर पवार साहेबांना आणि दादांना समाधानच वाटेल,” असं म्हणून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुण्यात गुन्हेगारांना दिलेल्या उमेदवारीवरूनही त्यांनी “उमेदवार पात्र असल्यामुळेच संधी दिली असेल,” अशी मवाळ भूमिका घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. लंकेंच्या या विधानामुळे पडद्यामागे नक्की काय शिजतंय? याची चर्चा आता रंगू लागली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install