Share

रस्ते नाही, यावेळी चर्चा ‘तिची’; नितीन गडकरींनी सांगितलं आवडत्या अभिनेत्रीचं नाव, फराह खानही चकीत!

Union Minister Nitin Gadkari reveals late actress Vidya Sinha as his favorite Bollywood actress during a candid interaction with Farah Khan.

Published On: 

Union Minister Nitin Gadkari reveals late actress Vidya Sinha as his favorite Bollywood actress during a candid interaction with Farah Khan.

दिल्ली – राजकारणात नेहमी रस्ते, पूल आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या गप्पा मारणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) जेव्हा सिनेमावर बोलतात, तेव्हा काय होतं? असाच काहीसा रंजक किस्सा नुकताच समोर आलाय. ‘रोडकरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडकरींनी चक्क आपल्या आवडत्या अभिनेत्रीचं नाव जाहीर केलंय आणि ते नाव ऐकून तुम्हालाही ७० च्या दशकातील रोमँटिक सिनेमांची आठवण येईल.

Nitin Gadkari reveals favorite actress Vidya Sinha

बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान (Farah Khan) सध्या तिच्या युट्यूब व्लॉग्समुळे चर्चेत आहे. सेलिब्रिटींच्या किचनमध्ये जाऊन जेवण बनवणारी फराह यावेळी थेट नितीन गडकरींच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचली. विशेष म्हणजे, फराहला भेटण्यासाठी गडकरींच्या पत्नीने खास नागपूरहून दिल्ली गाठली होती. या गप्पांच्या ओघात फराहने गडकरींना विचारलं, “तुम्हाला सिनेमे बघायला वेळ मिळतो का?” यावर गडकरींनी हसून होकार दिला. इतकंच नाही तर त्यांनी फराहचे ‘ओम शांती ओम’ आणि ‘मैं हूं ना’ हे सिनेमे पाहिल्याची कबुलीही दिली.

जेव्हा फराहने गडकरींना त्यांच्या आवडत्या कलाकारांबद्दल छेडलं, तेव्हा त्यांनी अमिताभ बच्चन हे माझे आवडते अभिनेते असल्याचं सांगितलं. पण जेव्हा विषय आवडत्या अभिनेत्रीवर आला, तेव्हा गडकरींनी क्षणाचाही विचार न करता ‘विद्या सिन्हा’ (Vidya Sinha) यांचं नाव घेतलं. ‘रजनीगंधा’ फेम विद्या सिन्हा यांचा साधेपणा आणि अभिनय गडकरींना प्रचंड भावला होता.

कोण होत्या विद्या सिन्हा?

‘रजनीगंधा’, ‘छोटी सी बात’ आणि ‘पती पत्नी और वो’ यांसारख्या क्लासिक चित्रपटांमधून ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं, त्या म्हणजे विद्या सिन्हा. साडी नेसलेली, कपाळावर छोटीशी टिकली आणि चेहऱ्यावर निखळ हास्य… ही त्यांची ओळख होती. १५ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांचं निधन झालं.

गडकरींच्या या खुलाशामुळे जुन्या सिनेमांच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. सध्या फराह खानचा हा व्लॉग आणि गडकरींचा हा ‘फिल्मी अंदाज’ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install