Share

T20 World Cup 2026: ‘मैदानात कोणीही येणार नाही…’; अश्विनच्या ‘त्या’ विधानाने खळबळ, ICC वर डागली तोफ!

Ashwin criticizes ICC schedule, predicts low crowd turnout for T20 World Cup 2026 due to weak matchups like India vs USA.

Published On: 

R Ashwin on HIndi Language

मुंबई – वर्ल्डकप म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो क्रिकेटचा महाकुंभ आणि ओसंडून वाहणारी स्टेडिअम्स. पण याच महाकुंभाकडे प्रेक्षक यावेळी चक्क पाठ फिरवणार आहेत का? हे आम्ही नाही, तर खुद्द टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन याने म्हटलं आहे. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी टी-20 वर्ल्डकपबद्दल बोलताना अश्विनने ( R Ashwin ) “यावेळी होणारा टी20 वर्ल्डकप ( T20 World Cup 2026 ) पाहायला कोणीच जाणार नाही,” असे खळबळजनक विधान करत आयसीसीच्या नियोजनाचे वाभाडे काढले आहेत.

R Ashwin criticizes ICC T20 World Cup schedule

युट्यूब चॅनलवर बोलताना अश्विनने थेट स्पर्धेच्या फॉरमॅटवरच बोट ठेवलंय. भारत ‘अ’ गटात असून त्यांची लढत पाकिस्तानसह अमेरिका, नामीबिया आणि नेदरलँड्सशी होणार आहे. अश्विनच्या मते, “भारत-अमेरिका किंवा भारत-नामीबिया असे एकतर्फी सामने तुम्हाला स्पर्धेच्या थरारापासून दूर नेतात.” जर सुरुवातीलाच भारताची टक्कर इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियासारख्या बड्या संघांशी झाली असती, तर स्पर्धेची रंगत पहिल्या दिवसापासून वाढली असती. मात्र, सध्याच्या वेळापत्रकामुळे सुपर-8 फेरी सुरू होईपर्यंत चाहत्यांचा उत्साह मावळलेला असेल, अशी भीती त्याने व्यक्त केली आहे.

जुन्या आठवणींना उजाळा देताना अश्विन म्हणाला, “जेव्हा मी शाळेत होतो, तेव्हा 1996, 1999 चे वर्ल्डकप म्हणजे सण असायचे. आम्ही वेळापत्रकाची कार्ड्स जपून ठेवायचो कारण वर्ल्डकप चार वर्षांतून एकदाच यायचा. पण आता चित्र बदललंय.” सततच्या क्रिकेटमुळे आणि अशा कंटाळवाण्या सामन्यांमुळे चाहत्यांचा रस कमी होत असल्याचं स्पष्ट मत त्याने मांडलं.

इतकेच नाही तर, अश्विनने वनडे क्रिकेटबद्दलही धोक्याची घंटा वाजवली आहे. “2027 च्या वर्ल्ड कपनंतर वनडे फॉरमॅटचं काय होणार, याचा गंभीर विचार आयसीसीला करावा लागेल,” असं सांगत त्याने ( R Ashwin ) भविष्यातील बदलांचे संकेत दिले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही