🕒 1 min read
नवी दिल्ली: नवीन वर्ष २०२६ ची सुरुवात भारतीय करदात्यांसाठी (Taxpayers) एका मोठ्या क्रांतीने झाली आहे. देशातील कर प्रणालीत गेल्या ६० वर्षांतील सर्वात मोठे बदल १ जानेवारीपासून लागू झाले असून, नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता १२ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त असणार आहे, तर पॅन-आधार लिंक न केलेल्यांसाठी मात्र अडचणी वाढल्या आहेत.
बजेट २०२५ मध्ये जाहीर केल्याप्रमाणे, नवीन कर प्रणालीनुसार (New Income Tax Rules) करदात्यांना १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. यात ७५,००० रुपयांचे स्टँडर्ड डीडक्शन मिळवल्यास, नोकरदार वर्गासाठी आता १२.७५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न पूर्णपणे टॅक्स फ्री झाले आहे. यापूर्वी ही मर्यादा ७ लाख रुपये होती, त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशात आता अधिक पैसा खेळता राहणार आहे.
दुसरीकडे, ३१ डिसेंबर २०२५ ची डेडलाईन हुकलेल्यांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. ज्यांनी पॅन-आधार लिंक केले नाही, त्यांचे पॅन कार्ड १ जानेवारीपासून ‘इनऑपरेटिव्ह’ (Inoperative) झाले आहे. आता लिंक करण्यासाठी १,००० रुपये दंड भरावा लागेल. तोपर्यंत आयटी रिटर्न भरणे, रिफंड मिळवणे किंवा बँक खाते उघडणे यांसारखे व्यवहार ठप्प होऊ शकतात, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.
ज्येष्ठ नागरिकांनाही (Senior Citizens) सरकारने मोठी भेट दिली आहे. बँकांमधील फिक्स डेपॉझिटवर (FD) मिळणाऱ्या व्याजावरील टीडीएस (TDS) मर्यादा आता ५० हजारांवरून १ लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच, जुन्या चुका सुधारण्यासाठी टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत आता २४ महिन्यांवरून ४८ महिने करण्यात आली आहे.
एप्रिल २०२६ पासून १९६१ चा जुना कायदा हद्दपार होऊन ‘इनकम टॅक्स ॲक्ट २०२५’ पूर्णपणे लागू होईल. यात कायद्याची क्लिष्ट भाषा बदलून ती सोपी करण्यात आली असून, कलमांची संख्या ८०० वरून ५०० वर आणली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ह्युंदाई, महिंद्राला धोबीपछाड! टाटा मोटर्सची जोरदार मुसंडी; ‘या’ दोन गाड्यांनी बदललं मार्केटचं गणित
- नवीन वर्षाची सुरुवात ‘महागाई’च्या चटक्याने; गॅस सिलिंडर महागला, तर ‘पॅन’ कार्डबद्दल मोठी अपडेट!
- Team India Schedule 2026: ११ जानेवारीपासून न्यूझीलंड मालिका; १५ फेब्रुवारीला रंगणार भारत-पाक महामुकाबला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












