Share

Team India Schedule 2026: ११ जानेवारीपासून न्यूझीलंड मालिका; १५ फेब्रुवारीला रंगणार भारत-पाक महामुकाबला

India gears up for a busy 2026 with T20 World Cup, Ind vs Pak clash on Feb 15, and Asian Games.

Published On: 

India gears up for a busy 2026 with T20 World Cup 2026, Ind vs Pak clash on Feb 15, and Asian Games.

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी २०२६ हे वर्ष खऱ्या अर्थाने ‘नॉन-स्टॉप’ ॲक्शनचे ठरणार आहे. ११ जानेवारीला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेने टीम इंडियाच्या या वर्षाच्या मोहिमेचे रणशिंग फुंकले जाणार आहे. पण चाहत्यांचे डोळे लागून राहिले आहेत ते फेब्रुवारीत होणाऱ्या टी-२० विश्वचषकाकडे (T20 World Cup 2026). विश्वचषकात १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) आमनेसामने येणार आहेत, त्यामुळे आतापासूनच उत्सुकता वाढली आहे.

IND vs Pak Cricket Schedule 2026 

टीम इंडियासाठी सध्याची परिस्थिती ‘कहीं खुशी, कहीं गम’ अशीच आहे. २०२५ मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकून मर्यादित षटकांच्या (White Ball) क्रिकेटमध्ये आपली दादागिरी सिद्ध केली. मात्र, दुसरीकडे कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) भारताची पुरती वाट लागली आहे. गौतम गंभीरच्या कोचिंगखाली भारताला न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर ३-० अशी मानहानीकारक ‘सफेद धुलाई’ स्वीकारावी लागली, तर आफ्रिकेतही ४०८ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे २०२६ मध्ये कसोटी क्रिकेटमधील गेलेली पत परत मिळवणे, हे गंभीर आणि कंपनीसमोरचे सर्वात मोठे आव्हान असेल.

रोहित-विराटचे काय?

कसोटी आणि टी-२० मधून निवृत्ती घेतलेले दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली आता केवळ वनडे फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करत आहेत. २०२७ च्या वनडे वर्ल्डकपची तयारी म्हणून ते न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत दिसतील.

यंदाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे. आयपीएलनंतर जुलैमध्ये इंग्लंड दौरा, ऑगस्टमध्ये श्रीलंकेत कसोटी मालिका आणि सप्टेंबरमध्ये जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games) असा कार्यक्रम आहे. विशेष म्हणजे आशियाई स्पर्धेतही टी-२० फॉरमॅट असल्याने तिथेही भारताला सुवर्णपदकाची संधी आहे. वर्षाचा शेवट न्यूझीलंडच्या खडतर दौऱ्याने होणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!