पुणे, (१६ जुलै २०२५): संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी गंभीर आरोप करत, आपल्यावरील हल्ला हा ‘सरकारपुरस्कृत’ असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे, या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात ‘खोटी माहिती’ दिल्याचेही गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
रविवारी (१३ जुलै) अक्कलकोट येथे शिवधर्म प्रतिष्ठान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यातील मुख्य आरोपी दीपक काटे (Deepak Kate) हा भारतीय जनता पक्षाचा (BJP) पदाधिकारी असल्याचे समोर आल्यानंतर, गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि सरकारवर जोरदार टीका केली.
Pravin Gaikwad alleges CM Fadnavis, Bawankule
गायकवाड म्हणाले, “माझ्यावरील हल्ला केवळ निषेध करण्यासाठी नव्हता, तर तो एक पूर्वनियोजित कट होता. भाजपने अद्यापही हल्लेखोर दीपक काटे याची पक्षातून हकालपट्टी केलेली नाही, यावरूनच हा हल्ला सरकारच्या संमतीने झाल्याचे स्पष्ट होते.”
प्रवीण गायकवाड यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही थेट हल्लाबोल केला. “बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी जाहीर सभेत ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी तुझ्या पाठीशी आहोत,’ असे दीपक काटेला सांगितल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. यावरूनच माझ्यावरील हल्ल्याचे खरे सूत्रधार बावनकुळेच आहेत, हे सिद्ध होते,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणात ‘मकोका’ ( MCOCA ) कायद्यांतर्गत कारवाई होणे अपेक्षित असताना, अक्कलकोट येथील तपास अधिकारी बावनकुळे यांचे नातेवाईक असल्याचा दावाही गायकवाड यांनी केला. “काटेला जामीन मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून विशेष प्रयत्न करण्यात आले,” असे सांगत, “काटे याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, अशा गुन्हेगाराला भाजयुमोचे सरचिटणीसपद कसे काय दिले जाते?” असा प्रश्नही गायकवाड यांनी उपस्थित केला.
आपल्यावरील या ‘सरकारपुरस्कृत’ हल्ल्याचा निषेध करणार नसल्याचे प्रवीण गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, “आम्ही लोकशाही मूल्ये मानतो आणि तरुणांना योग्य दिशा देण्याचे काम करतो. सामाजिक तेढ कमी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड नेहमीच सक्रिय असते. ही आमची चूक आहे का?” या प्रश्नासह त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले. “ब्रिगेड जशास तसे उत्तर देणार आहे,” असा इशाराही गायकवाड यांनी यावेळी दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी कराल? जाणून घ्या सोपे टप्पे आणि करा आर्थिक भविष्य सुरक्षित!
- एसईओ (SEO) म्हणजे काय आणि ते कसे कराल?
- फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिली ‘ही’ ऑफर; त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












