🕒 1 min read
मुंबई : आकाशवाणी आमदार निवासात शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ सुरू आहे. या वादळात आता आणखी एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे – मारहाण करणाऱ्या आमदारावर अद्याप कारवाई न झालेली असतानाच, संबंधित कॅन्टिनचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
ही घटना मंगळवारी रात्री १०च्या सुमारास घडली. संजय गायकवाड जेवणाच्या निकृष्ट दर्जावरून चिडून थेट बनियान व टॉवेलवर कॅन्टिनमध्ये घुसले आणि कर्मचाऱ्यावर सर्वांसमोर हात उचलला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि टीकेचा भडिमार सुरू झाला. विरोधकांनी सभागृहात गायकवाडांच्या निलंबनाची मागणी लावून धरली आहे.
Sanjay Gaikwad Assault: Canteen License Revoked
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या प्रकरणात हस्तक्षेप करत कॅन्टिनचा परवाना तातडीने रद्द केला. अजंता केटरर्सच्या नावावर असलेल्या परवान्यातील अन्नपदार्थांचे नमुने ( पनीर, डाळ, सॉस इ.) – तपासणीसाठी घेतले गेले असून, त्याचे अहवाल १४ दिवसांत येणार आहेत. मात्र, अहवाल न येताच FDA ने परवाना थांबवला, अशी माहिती समोर आली आहे.
“२६ जून २०२४ ते २७ सप्टेंबर २०२७ या कालावधीसाठी दिलेला परवाना तत्काळ रद्द करण्यात येत आहे. या दरम्यान कोणताही अन्नव्यवहार केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” अशी स्पष्ट नोटीस संबंधित केटरिंग कंपनीला देण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या संजय गायकवाड यांच्यावर कुठलीही कार्यवाही का झालेली नाही? शासनाचा रोष केवळ सामान्य व्यावसायिकांवरच का? असा प्रश्न विरोधक विचारत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- खडकवासला धरण परिसरातील अतिक्रमणाची मंत्र्यांकडून विधिमंडळात कबुली
- आमदाराच्या मारहाणीचे विधान परिषदेत पडसाद: ‘टॉवेल, बनियानवरील आमदाराला लगाम घाला!’
- मीरा-भाईंदर मनसे मोर्चाला अखेर परवानगी; फडणवीस सरकार घाबरलं म्हणून झुकलं! मनसेचा दावा













