Share

ठाकरे-मनसे युतीच्या चर्चेला वेग; आदित्य ठाकरेंचा सकारात्मक सूर

Aditya, Uddhav Thackeray and Kishori Pednekar express openness to alliance with MNS.

Published On: 

Aditya Thackeray to Lead Water Crisis Protest in Chhatrapati Sambhajinagar on May 16

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. या संभाव्य युतीवर आता आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. तिघांनीही युतीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.

आमदार आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आलं की, मनसेसोबत युती होण्याची शक्यता आहे का? यावर त्यांनी उत्तर दिलं, “राज्यावर जे अत्याचार सुरू आहेत, त्यावर बदल घडवणं ही आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्र हितासाठी लढणारे सगळे पक्ष एकत्र येणं गरजेचं आहे.”

Uddhav Thackeray group alliance with MNS

या आधी उद्धव ठाकरे यांनीही सूचक वक्तव्य करत म्हटलं होतं, “जनतेच्या मनात जे आहे, तेच होईल. मी संदेश देणार नाही, थेट बातमी देईन. आमच्या आणि त्यांच्या सैनिकांमध्ये संभ्रम नाही.”

दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही ही युती होण्याची शक्यता सांगितली आहे. “२०२२ मध्ये जे काही राजकारण घडलं त्याचा त्रास सर्वसामान्यांना झाला. परप्रांतीयांचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे ही युती आवश्यक आहे,” असं सांगत त्यांनी सांगितलं की ठाकरे गट या युतीसाठी सकारात्मक आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही