🕒 1 min read
वॉशिंग्टन | प्रतिनिधी – डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यातील संबंध अखेर संपले आहेत. खुद्द ट्रम्प यांनी याची घोषणा करत मस्क यांना “गंभीर परिणामांची” थेट धमकी दिली आहे. अमेरिकेतील एका मोठ्या नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आता मस्कसोबत कोणताही संबंध ठेवायचा नाही.”
ट्रम्प यांनी हे वक्तव्य ‘बिग ब्यूटीफुल बिल’ या कर विधेयकावरून उभ्या राहिलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केले. मस्क यांनी या विधेयकाला विरोध दर्शवला होता आणि त्यानंतर त्यांनी ट्रम्प प्रशासनातील सल्लागार पदाचा राजीनामा दिला.
Donald Trump Ends Ties With Elon Musk
मुलाखतीदरम्यान ट्रम्प म्हणाले, “मी निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकली. मी अनेकांना संधी दिली. पण आता मस्कशी काहीही देणंघेणं नाही. त्यांनी जर डेमोक्रॅट्सना किंवा आमच्या विरोधात निधी दिला, तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.”
सरकारी करार आणि अनुदान रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सध्या काही निर्णय झाले नसले तरी, मस्क यांची आर्थिक चौकशी व्हावी अशी मागणी ट्रम्प समर्थकांकडून जोर धरू लागली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ते २५ जागाही जिंकू शकत नव्हते… मोदी, फडणवीसांना खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार – संजय राऊत
- ठाकरे बंधूंच्या युतीवर राजकारण तापलं; खैरे-कीर्तिकर आमनेसामने
- नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर निलेश राणेंचा संयमाचा सल्ला













