Share

हा प्रसिद्ध अभिनेता RCB च्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहलीसाठी मंदिर बांधणार?

TV actor Nakuul Mehta went viral for his fun vow to build a temple for Virat Kohli if RCB won IPL 2025. Now that RCB is champion, fans are asking him to fulfill his promise.

Published On: 

Will this actor build a temple for Virat Kohli after RCB's victory?

बंगळुरू : 18 वर्षांची प्रतीक्षा संपवून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने अखेर IPL जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या अंतिम सामन्यात सहा धावांनी विजय मिळवत RCBने पहिल्यांदाच हा मान पटकावला. या विजयानंतर सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे, आणि सोशल मीडियावरही एक व्हिडीओ विशेष चर्चेत आहे.

लोकप्रिय टीव्ही अभिनेता नकुल मेहता (Nakuul Mehta) ज्याने ‘इश्कबाज’ आणि ‘बडे अच्छे लगते है’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत, याने IPL फायनलपूर्वी एक मजेशीर आणि भावनिक व्हिडीओ पोस्ट केली होता. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो, “18 वर्षांनंतर अखेर तो दिवस आला आहे. मिस्टर 18, म्हणजे विराट कोहली (Virat Kohli), आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. तो यंदा आपली पहिली ट्रॉफी उचलणार आहे!”

Will this actor build a temple for Virat Kohli after RCB’s victory?

नकुल पुढे म्हणतो, “RCBने फक्त हा सामना जिंकावा, मी कन्नड भाषा शिकेन, रसम रोज खाईन, विराट कोहलीसाठी मंदिर बांधेन आणि विजय माल्याचं सगळं कर्ज फेडेन!”

RCBच्या विजयानंतर नेटकऱ्यांनी नकुलच्या या वक्तव्याची आठवण काढत सोशल मीडियावर त्याच्या मंदिराच्या वचनावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही