Share

‘झापुक झुपूक’ स्टार सूरज चव्हाणला शाहीर दादा कोंडके पुरस्कार; ‘लय भारी वाटतंय’ म्हणत चाहत्यांचे आभार

Bigg Boss Marathi 5 winner Suraj Chavan receives the Shahir Dada Kondke Award for his performance and popularity. Fans celebrate this proud moment.

Published On: 

'Zhapuk Zhapuk' star Suraj Chavan receives Shahir Dada Kondke Award; Thanks fans saying 'The rhythm feels heavy'

Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याला नुकताच स्वर्गीय शाहीर दादा कोंडके यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार सूरजच्या हाती पडला. या सोहळ्याला त्याची बिग बॉस सहस्पर्धक जान्हवी किल्लेकर देखील उपस्थित होती.

सूरजने आपल्या इन्स्टाग्रामवर हा आनंदाचा क्षण शेअर करत लिहिलं – “तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मला दादा कोंडके यांच्या नावाने पुरस्कार मिळाला, लय भारी वाटतंय!”

‘Zhapuk Zhapuk’ star Suraj Chavan receives Shahir Dada Kondke Award

‘झापुक झुपूक’ सिनेमातून सूरजने मोठी लोकप्रियता मिळवली. टिकटॉक व्हिडीओमधून चर्चेत आलेल्या सूरजला सुरुवातीला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं होतं. मात्र, बिग बॉस शोमध्ये त्याच्या साध्या आणि निरागस स्वभावामुळे प्रेक्षक त्याच्यावर प्रेम करायला लागले आणि तो थेट विजेता ठरला.

हा पुरस्कार मिळाल्याने चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून सोशल मीडियावर त्याचं प्रचंड कौतुक होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install