Share

वयाचं भान ठेवा, टोपाचे केसही पिकलेत! राऊतांचा राणेंना झणझणीत टोला!

Sanjay Raut hits back at Narayan Rane: “Mind your age, your hair has turned grey!” Also targets PM Modi over Pakistan visit.

Published On: 

Sanjay Raut Criticized State government due to increase in cylinder price

🕒 1 min read

मुंबई– पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादात आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आमनेसामने आले आहेत.

राणेंनी राऊतांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना जेलमध्ये गेल्याची आठवण करून दिली होती. यावर उत्तर देताना संजय राऊतांनी राणेंना खोचक टोला लगावला आहे. “आपलं वय झालंय, टोपाचे केस पिकलेत, थोडं भान ठेवावं”, अशा शब्दांत राऊतांनी राणेंना सुनावलं.

Sanjay Raut Slams Narayan Rane

राऊतांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. “पाकिस्तानात कोणाला पाठवायचं, मोदींना की राणेंना?” असा संतप्त सवाल करत, नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक कापायला मोदी गेले होते, हे राणेंना आठवून दिलं. “आम्ही नाही गेलो पाकिस्तानात, तुम्ही पाठवलं तर मोदीच गेले”, असं म्हणत त्यांनी टोमणा मारला.

तसेच, “राणे हे स्वत:चा पक्ष काढून दंडावरच्या बेंडकुळ्या दाखवल्या असत्या तर आम्ही तुम्हाला मानलं असतं. राज ठाकरे यांचा स्वत:चा पक्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे चोरलेला पक्ष आहे, पण तुम्ही भाजपचे आश्रित आहात. उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वत:चे 20 आमदार आणि 9 खासदार आहेत. त्यामुळे त्यांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”, असंही राऊत म्हणाले. राऊतांनी भाजप आणि राणेंना लक्ष करत, “फक्त पेट्रोल पंपाचे आकडे नको, खासदारांचे आकडे मोजा” असा चिमटा घेत भाजपच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही