Share

आजही शरद पवारांसोबतच आहे, अजित पवार गटात जाण्याचा प्रश्नच नाही – एकनाथ खडसे

I am still with Sharad Pawar, not joining Ajit Pawar group- Eknath Khadse

Published On: 

Eknath Khadse clears the air: “I’m still with Sharad Pawar, not joining Ajit Pawar group.”

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या मुंबईतील बैठकीपूर्वी एक मोठी चर्चा रंगली होती. शरद पवार यांच्या गटातील काही नेते अजित पवार गटात जाण्याच्या विचारात असल्याची शक्यता वर्तवली जात होती. यामध्ये विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांचंही नाव घेतलं जात होतं.

मात्र, बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “अजित पवार यांच्या गटात जळगावमधील काही मंडळी गेली होती. ज्याना जायचे होते ते गेले, ज्याना राहायचे होते ते राहिले. आता कोणी जाईल असं वाटत नाही.”

Eknath Khadse Denies Joining Ajit Pawar

तसंच त्यांनी अजित पवारांच्या गटात जाण्याच्या शक्यतेबाबत स्पष्ट भूमिका घेत म्हणाले, “शरद पवारांचा निर्णय हाच आमचा निर्णय. जो निर्णय शरद पवार घेतील, तो आम्ही मान्य करू. पण आज तरी अजित पवार गटात जाण्याचा कुठलाही विचार नाही. जेव्हा वेगळा गट झाला तेव्हाही मला बोलावलं होतं, पण मी गेलो नाही. आणि आताही मी शरद पवारांसोबतच आहे.”

दरम्यान, मागील काही आठवड्यांपासून शरद पवार आणि अजित पवार हे अनेक कार्यक्रमांत एकत्र दिसत असून दोघांमध्ये समेट होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही गट पुन्हा एकत्र आले, तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं पुन्हा बदलतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही