Share

भारत-पाक संघर्षाच्या छायेत परमाणु धोका वाढतोय – पाक संरक्षण मंत्र्यांची कबुली

Pakistan’s Defence Minister says nuclear option is not being considered “right now” amid rising tensions with India.

Published On: 

Khawaja Asif says nuclear option is not being considered “right now” amid rising tensions with India.

भारतासोबत तणाव वाढत असतानाही पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्पष्ट केले आहे की, अण्वस्त्र वापरण्याचा पर्याय “सध्या विचाराधीन नाही.” त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “जर परिस्थिती पुढे गेली, तर ही विनाशाची प्रक्रिया फक्त या प्रदेशापुरती मर्यादित राहणार नाही, तर अधिक व्यापक स्वरूप घेऊ शकते. भारत-पाक संघर्षाच्या छायेत परमाणु धोका वाढत” असल्याची कबुली पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफने दिली.

Nuclear Option Not Being Considered Yet: Khawaja Asif

“भारत जे वातावरण निर्माण करत आहे, त्यामुळे आमचे पर्याय कमी होत चालले आहेत,” असेही ते म्हणाले. त्यांनी यासोबत स्पष्ट केले की, पाकिस्तानच्या अण्वस्त्र धोरणावर निर्णय घेणाऱ्या National Command Authority ची बैठक अद्याप बोलावण्यात आलेली नाही. पाकिस्तानने काल रात्री फतेह-1 मिसाइल डागलं होते. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने हे मिसाइल हवेतच नष्ट केलं.

भारतीय लष्कराकडून पाकिस्तानची पोलखोल

भारताच्या विविध लष्करी ठिकाणांवर पाकिस्तानकडून सातत्याने हल्ले होत असल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. श्रीनगरसह अनेक भागांत पाकिस्तानकडून हवाई घुसखोरीचे प्रयत्न करण्यात आले, तसेच भारतीय लष्करी तळ आणि वैद्यकीय केंद्रांना थेट लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कर्नल कुरेशी यांनी सांगितले की, उधमपूर आणि भटिंडा येथील लष्करी सुविधांमध्ये नुकसान झाले आहे. पंजाबमधील एका एअरबेसवर आग लावण्याचा प्रयत्न झाला. पाकिस्तानने नागरी विमानांचा वापर करत लष्करी हालचाली लपवण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय वायुदलाने वेळीच प्रत्युत्तर देत ही हालचाल निष्फळ ठरवली.

तसेच पाकिस्तानकडून खोट्या माहितीचा वापर करून भारतातील सुरतगड व चंदीगडमध्ये स्फोटक साठे उडवण्यात आल्याच्या अफवा पसरवत आहे. भारतीय सशस्त्र दलांना संघर्ष नको असून शांततेच्या प्रयत्नांना भारत प्राधान्य देत आहे, असं कर्नल कुरेशी यांनी नमूद केलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install