Share

संजय दत्तच्या ‘द भूतनी’ चित्रपटात हॉररपेक्षा कॉमेडी अधिक, काय आहे चित्रपटाची कथा?

The Bhootni, starring Sanjay Dutt, offers a mix of horror and comedy but falls short in comparison to genre hits like Stree. Read the full review to know if it’s worth your time.

Published On: 

Sanjay Dutt's film 'The Bhootni' is more comedy than horror, what is the story of the film?

🕒 1 min read

मुंबई  बॉलीवूडमध्ये सध्या हॉरर-कॉमेडी चित्रपटांचा ट्रेंड वाढताना दिसतोय. ‘स्त्री’, ‘मुंज्या’ यांसारख्या यशस्वी सिनेमांनंतर आता संजय दत्त ‘द भूतनी’ घेऊन प्रेक्षकांसमोर आला आहे. चित्रपटाच्या कथेचा पाया रंजक असला तरी त्याची मांडणी अधूनमधून फिसकटते. संजय दत्तचा अ‍ॅक्शन अवतार चित्रपटाला थोडं उचलून धरतो, पण संपूर्ण सिनेमावर त्याचा प्रभाव टिकून राहत नाही.

कथा थोडक्यात: सेंट व्हिन्सेंट कॉलेजच्या व्हर्जिन ट्रीभोवती चित्रपटाची कथा फिरते. दरवर्षी व्हॅलेंटाईन डेला एक भूतनी या झाडावरून जागी होते आणि खऱ्या प्रेमाच्या शोधात कोणाला तरी टारगेट करते. यावर्षी तिचं लक्ष्य आहे शांतनु (सनी सिंह), ज्याच्या जीवावर बेतलेलं आहे. या संकटातून त्याला वाचवण्यासाठी घोस्टबस्टर कृष्णा त्रिपाठी (संजय दत्त) मैदानात उतरतो.

Sanjay Dutt film ‘The Bhootni’ is more comedy than horror, what is the story of the film?

चित्रपटाचं परीक्षण: ‘द भूतनी’मध्ये खरंतर भीतीपेक्षा विनोदाचं प्रमाण अधिक आहे. चित्रपटात हॉरर दृश्यांपेक्षा मौनी रॉयच्या किंचाळ्याच जास्त ऐकू येतात. पहिला हाफ काहीसा संथ असून, कथानक फक्त दुसऱ्या हाफमध्ये रंगतं. दिग्दर्शक सिद्धांत सचदेव यांनी लेखनासह दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्यासोबत वंकुश अरोरा यांनी संवाद लिहिले असून काही ठिकाणी चांगले पंचेस दिले आहेत. तरीही पटकथेमधील गतीचा अभाव जाणवतो.

अभिनय: संजय दत्तचा अभिनय नेहमीप्रमाणे दमदार आहे. भूतांवर बंदूक चालवणं हास्यास्पद वाटू शकतं, पण दत्तच्या अ‍ॅक्शनमुळे तो विश्वसनीय वाटतो. सनी सिंहची भूमिका फारशी उठून दिसत नाही. पलक तिवारीने छोट्याशा भूमिकेत लक्ष वेधलं आहे. निकुंज शर्मा म्हणजेच ‘बी यूनिक’ हा चित्रपटातील एक सरप्राइज पॅकेज आहे. मौनी रॉयने अपेक्षित पातळीवरच अभिनय केला असून काहीसा एकसुरी वाटतो.

पाहावा की नाही?
‘द भूतनी’ हा चित्रपट संजय दत्तच्या चाहत्यांसाठी एकदाच पाहण्यासारखा आहे. मुलांना योग्य वाटावा असा सौम्य हॉरर यात आहे, त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांच्या करमणुकीसाठी योग्य पर्याय ठरू शकतो. मात्र OTTवर उपलब्ध असलेल्या दर्जेदार कंटेंटच्या तुलनेत हा चित्रपट थोडा पातळ वाटतो. ‘मेंदू घरी ठेवून पाहा’ अशा कॅटेगरीत मोडणारा हा सिनेमा विनोदी मनोरंजनासाठीच योग्य आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही