Share

जळगावमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका; ५ बडे नेते अजित पवारांच्या गटात होणार सामील!

Big jolt to Sharad Pawar’s NCP faction! Two former ministers and three former MLAs from Jalgaon district are set to join Ajit Pawar’s NCP group on May 3.

Published On: 

Ajit Pawar statement about sharad pawar

राज्यातील राजकीय घडामोडींना सध्या वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराच्या हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत. अशातच जळगाव जिल्ह्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

शरद पवार गटातील दोन माजी मंत्री आणि तीन माजी आमदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील, महिला प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे आणि दिलीप वाघ यांचा समावेश आहे.

Sharad Pawar Faces Major Setback as Top 5 Leaders from Jalgaon Shift to Ajit Pawar’s NCP

या नेत्यांचा अधिकृत पक्षप्रवेश सोहळा येत्या ३ मे रोजी मुंबईत होणार आहे. याबाबतची माहिती माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, याआधीही महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी महायुतीत प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीसमोरील आव्हाने वाढत चालली आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install