Share

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला तरी मंत्रालयात नावाची पाटी कायम; चर्चांना उधाण

Despite resignation, Dhananjay Munde’s nameplate remains at Mantralaya, sparking political debate.

Published On: 

Dhananjay Munde Resignation: Nameplate Still Displayed at Mantralaya, Raises Questions

Dhananjay Munde | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर संताप व्यक्त झाला. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि दहशतीचा मुद्दा गाजत असताना, देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडसह सात जणांना अटक करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

देशमुख यांच्यावर झालेल्या मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना राजीनामा देण्यास भाग पाडले. मात्र, दोन महिने उलटल्यानंतरही मंत्रालयात त्यांच्या कार्यालयावर त्यांची नावाची पाटी कायम असून दालनही रिक्त ठेवण्यात आले आहे. यामुळे अनेक तर्क वितर्क सुरू झाले आहेत.

Why Is Dhananjay Munde Nameplate Still at Mantralaya Despite Resignation?

मंत्र्यांचा राजीनामा झाल्यानंतर लगेचच नावाची पाटी हटवली जाते, मात्र मुंडेंच्या बाबतीत वेगळा अपवाद पाहायला मिळतो आहे. यामुळे प्रशासनातील भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही राजीनामा घेण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता.

धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचे कारण प्रकृती अस्वस्थता सांगितले असले तरी, संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्या निकटवर्तीयाचा सहभाग असल्याने नैतिक जबाबदारी घेत राजीनामा देणे गरजेचे होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. बीडमधील स्थानिक प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनीही त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही