Share

विजयानंतर विराट कोहलीने राहुलला ‘माझं ग्राउंड’ स्टाईलमध्ये चिडवलं; व्हिडीओ व्हायरल

“Virat Kohli mimics KL Rahul’s ‘This is my ground’ celebration after RCB’s emphatic win against Delhi Capitals; hilarious video goes viral.”

Published On: 

Virat Kohli mimics KL Rahul’s ‘This is my ground’ celebration after RCB’s emphatic win against Delhi Capitals; hilarious video goes viral.

🕒 1 min read

आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सवर ६ विकेट्स आणि ८ चेंडू राखून सहज विजय मिळवत मागच्या पराभवाचा जोरदार बदला घेतला. दिल्लीच्या घरच्या मैदानावर, कठीण खेळपट्टी आणि प्रभावी गोलंदाजीमुळे आरसीबीसमोर आव्हान होतं, मात्र विराट कोहली ( Virat Kohli ) आणि कृणाल पंड्याने ११९ धावांची भागीदारी करत संघाला मोठा विजय मिळवून दिला.

या विजयाच्या जल्लोषात विराट कोहलीने दिल्लीचा स्टार फलंदाज केएल राहुलच्या ‘हे माझं ग्राउंड आहे’ सेलिब्रेशनची मजेदार नक्कल केली. हा क्षण सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.

Virat Kohli mimics KL Rahul celebration

या अगोदरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरील सामन्यात केएल राहुलने नाबाद ९३ धावांची धडाकेबाज खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर राहुलने ‘हे माझं ग्राउंड’ म्हणत बॅट उंचावत खास अंदाजात सेलिब्रेट केलं होतं. विराटने याचाच मजेशीर बदला घेतला. विजयानंतर विराटने राहुलसमोर कांतारा स्टाईलमध्ये बॅट आपटून सेलिब्रेट केलं. राहुलने पाहिलं नाही म्हणून विराटने पुन्हा तोच अभिनय केला, आणि शेवटी दोघंही हसत एकमेकांना मिठी मारताना दिसले.

या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी विराटची मजेशीर अ‍ॅक्टिंग कौतुक केली आहे, तर काहींनी म्हटलं, “विराट कधीच विसरत नाही!”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही