“5 तास 30 मिनिटे रुग्णावर उपचार नाही…”; Rupali Chakankar यांनी सांगितला घटनाक्रम!

“The pregnant woman patient was in Mangeshkar Hospital for five and a half hours. If she had been treated, she would have survived,” informed Rupali Chakankar.

Published On: 

Rupali Chakankar gave information about Tanisha Bhise's death case

Rupali Chakankar | पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांच्या कुटुंबाकडे दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न भरल्यानं या महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतलं नाही. योग्यवेळी उपचार न मिळाल्यानं या महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप रुग्णालयावर करण्यात येत आहे.या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त होत असतानाच आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी भिसे कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

Rupali Chakankar On Tanisha Bhise Death Case

या भेटीनंतर रुपाली चाकणकरांनी वैद्यकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आढाव बैठक घेतली. यानंतर त्यांनी पूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. “रुग्णाला २ एप्रिलला बोलावलं होतं. पण २८ मार्चला गर्भवती महिलेला रक्तस्राव होऊ लागल्याने त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यानुसार डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात येण्यास सांगितलं. स्टाफला डिलिव्हरीसाठी तयारी करण्यास सांगितलं. त्यांनतर रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्याअगोदर त्यांच्याकडून १० लाखांची मागणी केली. मात्र रुग्णाच्या कुटुंबीयांनी ‘एवढे पैसे आत्ता नाहीत, ३ लाखांपर्यंत भरू शकतो. उद्यापर्यंत पूर्ण पैसे भरतो’ असं सांगितलं.

“त्यानंतर मंत्रालयातून आणि विभागातून फोन गेले. तरीही याची दखल घेतली नाही. त्यामुळे रात्री अडीच वाजता रुग्ण बाहेर पडला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतानाही रुग्णावर कोणतेही उपचार झाले नाहीत. साडेपाच तास गर्भवती महिला रुग्ण मंगेशकर रुग्णालयात होती. त्यांच्यावर उपचार झाले असते तर त्या वाचल्या असत्या”, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही