Share

ओ Anil Parab, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी : चित्रा वाघ

Anil Parab had criticized Chitra Wagh for changing colors like a lizard. Wagh has taken notice of his statement.

by MHD

Published On: 

Chitra Wagh aggressive on Anil Parab statement in assembly

Anil Parab । दिशा सालियान प्रकरणाचे (Disha Salian case) आज अधिवेशनात पडसाद उमटले. याच प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. यामुळे राजकीय वातावरण चिघळले आहे. पाच वर्षांनंतर दिशा सालियनच्या (Disha Salian) कुटुंबीयांनी कोर्टात धाव घेतल्याने आमदार आदित्य ठाकरे यांची डोकेदुखी वाढू शकते.

याप्रकरणी राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. “भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची बायको आत्महत्या करायला चालली होती. त्याचा व्हिडीओ दिला त्याची चौकशी होत नाही आणि आदित्य ठाकरेंची चौकशी करता?,” असा सवाल ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला.

तसेच त्यांनी भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या सरड्याप्रमाणे रंग बदलतात, अशी टीका केली. यावरून चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “तुम्ही असाल पोपट पंडित, माझ्या कुटुंबाने दोन वर्ष सहन केले. तुमच्यासारखे 56 परब पायाला बांधून फिरते,” असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे.

“संजय राठोड प्रकरणात मी लढतच होती, मी लढाई लढली आहे. पण कोणी क्लिनचिट दिली, जे समोर आले त्यावर मी माझी भूमिका मांडली आहे. आम्हाला हलक्यात घेऊ नका. कारण आम्ही बोलायला लागलो तर समोरच्या सीट खाली होतील,” असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.

Chitra Wagh on Anil Parab

पुढे त्या म्हणाल्या की, “एसआयटी रिपोर्ट येऊ द्या, बोललो तर यांची ही हालत आहे. मुद्द्यांवर बोला, कुटुंबावर येऊ नका. आमचा नवरा आणि मुलगा काय करतो? त्यावर काय येता?”, असा टोला चित्रा वाघ यांनी अनिल परब यांना लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही