Share

Walmik Karad ला हायकोर्टाचा मोठा दिलासा, ‘ती’ चौकशी होणारच नाही

Walmik Karad । संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. हत्या आणि पवनचक्की खंडणीप्रकरणी वाल्मिक कराड चांगलाच अडचणीत आला आहे. सध्या याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई सुरु आहे. अशातच आता त्याला हायकोर्टाचा (High Court)  मोठा दिलासा मिळाला आहे. वाल्मिक कराडची राज्यात विविध ठिकाणी करोडो रुपयांची संपत्ती असल्याची माहिती समोर आली … Read more

by MHD

Published On: 

High Court rejects Walmik Karad ED inquiry petition

Walmik Karad । संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. हत्या आणि पवनचक्की खंडणीप्रकरणी वाल्मिक कराड चांगलाच अडचणीत आला आहे. सध्या याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई सुरु आहे. अशातच आता त्याला हायकोर्टाचा (High Court)  मोठा दिलासा मिळाला आहे.

वाल्मिक कराडची राज्यात विविध ठिकाणी करोडो रुपयांची संपत्ती असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे सर्वांना धक्का बसला होता. बेकायदेशीर कृत्य करत संपत्ती जमवली असल्याचा आरोप केला जात आहे. त्याच्याकडे इतका पैसा कुठून आला? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याच संदर्भात आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावत कराडची ईडी (ED) चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली. पण आता ती याचिका हायकोर्टाकडून फेटाळून लावण्यात आली आहे. यामुळे कराडला मोठा दिलासा मिळाला आहे.

Walmik Karad ED inquiry petition

या याचिकेतून याचिकाकर्त्यांचा हेतू स्पष्ट होत नाही, त्यामुळे याचिका सुनावणीस योग्य नसल्याचं मत मुख्य न्यायमूर्तींनी व्यक्त केले. इतकेच नाही तर केतन तिरोडकर यांना स्वैर याचिका दाखल केल्यामुळे एकूण 20 हजारांचा दंड ठोठावला आहे. त्यानंतर तिरोडकर यांच्या वकिलांनी याचिका माघारी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही