Share

“.. तोपर्यंत Ajit Pawar यांना राज्यात फिरू देऊ नका”; मराठा नेत्याची आक्रमक मागणी

On the resignation of minister Dhananjay Munde, the Maratha leader has targeted the deputy chief minister of the state, Ajit Pawar.

by MHD

Published On: 

Dont let Ajit Pawar move around state, Rambhau Gaikwad demand

Ajit Pawar । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या मारेकऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत. (Santosh Deshmukh murder case)

याच मोर्चादरम्यान, मराठा नेते रामभाऊ गायकवाड (Rambhau Gaikwad) यांनी आक्रमक मागणी केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत अजित पवार यांना राज्यात फिरू देऊ नका. दगडं घेऊन त्यांच्या समोर गेलं पाहिजे,” अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Rambhau Gaikwad on Ajit Pawar

तरीही अजित पवार हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाहीत? असा सवाल सर्वांच्या मनात पडला आहे. जर या प्रकरणी धनंजय मुंडेंचे नाव समोर आले तर अजित पवारांना मुंडेंचा राजीनामा घ्यावाच लागेल अशी तंबी देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही