Share

Devendra Fadnavis यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले; “माझ्यासाठी इंदिरा गांधी सगळ्यात मोठ्या व्हिलन”

Chief Minister Devendra Fadnavis has made a statement during the screening of the film Emergency, which may face criticism from the opposition.

by MHD

Published On: 

Indira Gandhi biggest villain said Devendra Fadanvis

🕒 1 min read

Devendra Fadnavis । वादाच्या भोवऱ्यात अडकलेला कंगना राणौत (Kangana Ranaut) चा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला (Emergency) प्रमाणपत्र दिले आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वीच कंगना राणौतने दिली होती. मुंबईत आज या चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती.

परंतु बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “इंदिरा गांधी यांनी आपल्या देशासाठी चांगलं काम केलं असून त्या देशाच्या खूप मोठ्या नेत्या होत्या. पण त्या काळात त्या आमच्यासाठी खूप मोठ्या व्हिलन होत्या,” असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

पुढे बोलताना त्यांनी कंगनाच्या (Kangana Ranaut upcoming film) अभिनयाची स्तुती केली आहे. “कंगनाने आणीबाणीचा तो काळ पुन्हा एकदा चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर आणला आहे. ती स्वत: या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून ती प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय देते. ती एक उत्तम अभिनेत्री आहे.”

Devendra Fadnavis on Indira Gandhi

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून त्यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागू शकतो. अगोदरच देवेंद्र फडणवीस यांना संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून टीकेचा सामना करावा लागत आहे. अशातच आता त्यांच्या या वक्तव्याची भर पडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही