Share

Santosh Deshmukh हत्या प्रकरणी हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

After Dhananjay Deshmukh’s agitation today, there is an important meeting between Santosh Deshmukh family and SIT chief Basavaraj Teli and CID officer Sachin Patil.

by MHD

Published On: 

Devendra Fadnavis call to beed SP & CID on santosh-deshmukh

Santosh Deshmukh । सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. या प्रकरणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी (Dhananjay Deshmukh) वाल्मिक कराड (Walmik Karad) वर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.

याप्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी बीडचे एसपी नवनीत कॉवत आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन करत तपास कुठपर्यंत आला याचा आढावा घेतला आहे. तसेच तपासामध्ये कुणालाही दयामया दाखवू नका, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

Devendra Fadanvis on Santosh Deshmukh case

महत्त्वाचे म्हणजे धनंजय देशमुख यांनी आज केलेल्या आंदोलनानंतर देशमुख कुटुंबीय आणि एसआयटीचे प्रमुख प्रमुख बसवराज तेली आणि सीआयडी अधिकारी सचिन पाटील यांची महत्त्वपूर्ण भेट होत आहे. यावेळी ते देशमुख कुटुंबियांना तपासाची माहिती देऊ शकतात. दरम्यान, केज पोलीस देशमुख कुटुंबीयांना भेटीसाठी मस्साजोगवरून केजला सोबत घेऊन जाणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही