सुरेश धस यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Ajit Pawar संतापले; म्हणाले, “राष्ट्रवादीतील ‘मुन्नी’…”

‘राष्ट्रवादीतील ही मुन्नी कोण’, असा प्रश्न अजित पवार (Ajit Pawar ) यांना विचारण्यात आला. यावर “ज्यांनी हा मुद्दा काढलाय त्यांनाच विचारा”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Published On: 

सुरेश धस यांच्या 'त्या' वक्तव्यावर Ajit Pawar संतापले; म्हणाले, "राष्ट्रवादीतील 'मुन्नी'..."

Ajit Pawar । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावर बोलताना अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले. या आरोपांवर प्रत्युत्तर देत असताना सुरेश धस यांनी मिटकरी यांना राष्ट्रवादीतील एक मुन्नी आरोप करायला सांगत आहे. त्या मुन्नीची मी सून्नी करणार असं यांनी म्हटलं होतं.

त्यांच्या या वक्तव्याबाबत विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी संताप व्यक्त केला. ‘राष्ट्रवादीतील ही मुन्नी कोण’, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. यावर “ज्यांनी हा मुद्दा काढलाय त्यांनाच विचारा”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

नेमकं काय म्हणाले होते सुरेश धस?

“राष्ट्रवादीत एक वरिष्ठ मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे आणि त्या मुन्नीला म्हणा…तू इथे ये…कुठे मिटकरी, सुरज चव्हाण या लहान पोरांना कशाला बोलायला लावते. मला माहितीये आणि मुन्नीला पण माहितीये मी कोणाबद्दल बोलत आहे. त्या मुन्नीने पुढे यावं. मुन्नी पुढे आल्यावर मी सुन्नी करतो”, असं वक्तव्य धस यांनी केलंय.

Amol Mitkari On Suresh Dhas

“संतोष देशमुख यांच्या हत्येच्या (Santosh Deshmukh murder) दोनच दिवसांपूर्वी वाल्मिक कराड आणि सुरेश धस यांच्यात संभाषण झालं होते. त्याचा कथित ऑडिओ पोलिसांकडे असल्याची माहिती आमच्याकडे आहे. जर वाल्मिक कराडचा खून किंवा खंडणी प्रकरणात दोषी असेल, तर सुरेश धस यांची चौकशीही करायला पाहिजे”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही