संतोष देशमुख हत्याप्रकरणात Suresh Dhas यांची नवी मागणी; म्हणाले…

“आरोपींना कोणालाही भेटू देऊ नका, आरोपींना त्याच्या नातेवाईकांना भेटता आलं नाही पाहिजे”, अशी मागणी यावेळी सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी केली आहे.

Published On: 

संतोष देशमुख हत्याप्रकरणात Suresh Dhas यांची नवी मागणी; म्हणाले...

Suresh Dhas । बीडच्या मस्साजोगचे सरसपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. ९ डिसेंबरला आधी त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना अत्यंत क्रूरपणे ठार करण्यात आलं. या हत्याप्रकरणावरुन राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. राज्यातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

दरम्यान आज संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सरपंच परिषदेकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात भाजप आमदार सुरेश धस ( Suresh Dhas ) हे देखील सहभागी झाले आहेत. आजच्या आंदोलनात बोलताना त्यांनी मोठी मागणी केली आहे.

Suresh Dhas on Santosh Deshmukh Murder Case

ते म्हणाले, “कितीही वेळ जाऊ द्या, संतोष देशमुख यांना मनातून उतरू देऊ नका. कितीही वेळ लागला तरी चालेल, आम्ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळून देऊ.” त्याबरोबरच आरोपींना कोणालाही भेटू देऊ नका, आरोपींना त्याच्या नातेवाईकांना भेटता आलं नाही पाहिजे”, अशी मागणी यावेळी सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही