“Walmik Karad वर ३०२ चा गुन्हा दाखल करा, कारण…”; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मागणी

वाल्मिक कराडवर ( Walmik Karad ) ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) यांनी यांसंदर्भात माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. 

Published On: 

“Walmik Karad वर ३०२ चा गुन्हा दाखल करा, कारण...”; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मागणी

Walmik Karad । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ( Santosh Deshmukh Murder Case ) अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. पण दिवसेंदिवस हे प्रकरण वेगळे वळण घेत आहे.

अशातच आता या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडवर ( Walmik Karad ) ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) यांनी यांसंदर्भात माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

“वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणात अटक झाली आहे. आवादा कंपनीतल्या दलित वॉचमनला खंडणीच्या प्रकरणावरुनच मारहाण करण्यात आली. मात्र वॉचमन दलित समाजाचा असल्याने गावातल्या सरपंचाने म्हणजे संतोष देशमुख यांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि खंडणी मागणाऱ्यांना तिथून जायला सांगितलं. त्याचा बदला म्हणून संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

या प्रकरणाचे धागेदोरे हे स्पष्टपणे वाल्मिक कराडपर्यंत जातात. त्यामुळे वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केलीय. या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही