Share

“जे आरोपींची मदत करत असतील त्यांना…”; Santosh Deshmukh यांच्या मुलीची प्रशासनाकडे ‘ही’ मागणी

संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांची मुलगी वैभवीने प्रशासनाकडे आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे. एक महिना होऊन गेला आम्हाला न्याय कधी मिळणार असा प्रश्न संतोष देशमुख यांच्या मुलीने विचारला आहे.

Published On: 

"जे आरोपींची मदत करत असतील त्यांना..."; Santosh Deshmukh यांच्या मुलीची प्रशासनाकडे 'ही' मागणी

Santosh Deshmukh । बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh murder csae ) हत्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. राजकीय वर्तुळात देखील यामुळे खळबळ उडालेली पाहायला मिळतेय. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सर्व आरोपी पकडले जावेत आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी अनेक मोर्चे आणि आंदोलनं सुरु आहेत.

सगळे आरोपी अद्याप पकडेले गेलेले नाहीत. त्यामुळे बीडमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय आणि संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांची मुलगी वैभवीने प्रशासनाकडे आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे.

एक महिना होऊन गेला आम्हाला न्याय कधी मिळणार असा प्रश्न संतोष देशमुख यांच्या मुलीने विचारला आहे. वैभवी म्हणाली, “आमची मागणी हीच आहे की आम्ही न्याय मागत आहोत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना झाला आहे. तरीही आरोपी पकडले जात नसतील तर आम्हाला न्याय कसा मिळणार? माझी विनंती आहे प्रशासनाला की जे कुणीही आरोपींची मदत करत असतील, त्यांना या प्रकरणात सहआरोपी केलं पाहिजे.”

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही